घरदेश-विदेशअयोध्येत गणेश पूजनाने श्री राम मंदिर भूमीपूजनाचा 'श्री गणेशा'

अयोध्येत गणेश पूजनाने श्री राम मंदिर भूमीपूजनाचा ‘श्री गणेशा’

Subscribe

आजपासून अयोध्येत भूमीपूजनास सुरूवात

आजपासून अयोध्येत भूमीपूजनास सुरूवात होणार आहे. आज सकाळी ९ वाजता गणपतीची पूजा केली जाणार असून ही पूजा सकाळी ९ वाजेपासून ते दुपारी १ या वेळात पार पडणार आहे. या पूजेच विशेष गणपतीची पूजा करून या शुभ कार्याचा श्री गणेशा केला जाणार आहे. या गणेशपूजेसाठी २१ पुजारी पूजा पाठ करणार असून त्यानंतर मंगळवारी रामाचे पूजन करण्यात येणार आहे.

ही पूजा सकाळी ९ वाजता सुरू झाली असून सुमारे ५ तास चालणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यात एकूण ६ पुजारी सामील असतील. यानंतर, भूमीपूजन कार्यक्रम ५ ऑगस्ट रोजी शुभ वेळेत होणार आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन करणे इतकेच मर्यादित पुजाऱ्यांचा सहभाग असणार आहे. आज गणेश पूजा कार्यक्रमांतर्गत भूमीपूजन सोहळ्याच्या ठिकाणीही पूजा केली जाईल. भूमीपूजन सोहळा शांततेत पार पडावा, अशी इच्छा व्यक्त केली जात असून यात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी प्रार्थना केली जाणार आहे. ही संपूर्ण पूजा काशी विधान परिषदेचे आचार्य आणि अयोध्याचे पुजारी करणार आहेत.

- Advertisement -

अयोध्येत ५ ऑगस्टला होणार्‍या राम मंदिर भूमीपूजनाची तयारी जोरात सुरू आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज अयोध्येत जाणार असून पूजनाचा आढावा घेणार आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ रविवारी भेट देणार होते. परंतु त्यांचे सहकारी कॅबिनेट मंत्री कमला राणी वरुण यांच्या निधनानंतर त्यांनी हा दौरा रद्द केला असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज दुपारच्या वेळात अयोध्येत पोहोचतील आणि संध्याकाळपर्यंत तिथेच असणार असून यावेळी मुख्यमंत्री या तयारीचा आढावा घेणार आहेत. याखेरीज पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमासंदर्भात अधिकाऱ्यांसह बैठक देखील घेणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ ऑगस्ट रोजी भूमीपूजन कार्यक्रमात हजेरी लावणार आहे. त्याचे नियोजन पाहून एसपीजीची टीम शुक्रवारी संध्याकाळी अयोध्येत दाखल झाली आहे. त्याचबरोबर एसएसपी आणि आयजी टीमने आतापर्यंत रामजन्मभूमी परिसराची पाहणी केली आहे.


पंतप्रधान मोदी, मायावतींसह ‘या’ नेत्यांनी दिल्या ‘रक्षाबंधन’ च्या शुभेच्छा!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -