घरताज्या घडामोडीचीनची भारतावर नजर; भारताशेजारी बनवत आहे 'कृत्रिम बेट'

चीनची भारतावर नजर; भारताशेजारी बनवत आहे ‘कृत्रिम बेट’

Subscribe

चीन सध्या भारतापासून थोड्याच अंतरावर समुद्रात एक कृत्रिम बेट तयार करत आहे. हे बेट भारतापासून अवघ्या ६८४ किमी अंतरावर मालदीवजवळ तयार केले जात आहे.

चीनच्या कुरापती दिवसेंदिवस सुरुच असल्याचे दिसून येत आहे. आधीच चीनमुळे जगाला कोरोना विषाणूचा सामना करावा लागत आहे. अनेक देशांना कोरोना विषाणूने वेढले आहे. चीनच्या शेजारी असलेले भारत, दक्षिण कोरिया, जपान इंडोनेशिया, थायलँड हे देश सध्या चिंतेत आहेत. मात्र, या दरम्यान, चीनची कारस्थान सुरु असल्याचे समोर आले आहे.

मालदीवजवळ तयार केले जात आहे बेट

चीन सध्या भारतापासून थोड्याच अंतरावर समुद्रात एक कृत्रिम बेट तयार करत आहे. हे बेट भारतापासून अवघ्या ६८४ किमी अंतरावर मालदीवजवळ तयार केले जात आहे. यामुळे भारतासह अनेक देशांना राजनैतिकदृष्ट्या धोका निर्माण होणार आहे. चीन कृत्रिम बेट तयार करत असल्याचे सॅटेलाइट फोटोंच्या माध्यमातून उघडकीस आले असून हे फोटो ओपन सोर्स इंटेलिजन्स Onalist डेट्रेस्फाने जारी केले आहे.

- Advertisement -

जगभरातील शस्त्रे खरेदी – विक्रीवर नजर ठेवणारी आंतरराष्ट्रीय एजन्सी सीआयपीआरआयचे संचालक हॅनेस क्रिस्टन्सन यांनी ट्विट करत सांगितले आहे की ‘मालदीवच्या फडुफिनोल्हू बेटाला मालदीव सरकारने चीनला ४ मिलियन डॉलर म्हणजेच ३०.३३ कोटी रुपयांना भाडेतत्त्वावर दिले होते. तसेच आता चीनने हे बेट आणखी वाढविले आहे. त्याचप्रमाणे यावर रस्ते आणि इमारती बांधलेल्या दिसत आहेत. विशेष म्हणजे मालदीवचे माजी राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन यांनी २०१६ मध्ये चीन कंपन्यांना १६ बेटे भाड्याने दिली होती. दरम्यान, आंतरराष्ट्रीय तज्ञांच्या मते चीन या माध्यमातून राजनैतिकदृष्ट्या भारताला वेढा घालण्याचा प्रयत्न करीत आहे.

मालदीवहून २० मिनिटे भारतात

चीन मालदीवच्या माध्यमातून भारतावर लक्ष ठेवून आहे. कारण मालदीवहून चीनचे लढाऊ विमान भारतात पोहोचण्यासाठी फक्त २० – २५ मिनिटे लागणार आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – CoronaVirus: वुहान शहरात कोरोना रुग्ण; तब्बत १ कोटी जनतेची होणार चाचणी


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -