घरदेश-विदेश२०२१ च्या सुरूवातीला उपलब्ध होणार कोरोनाची लस; 'या' देशानं केला दावा

२०२१ च्या सुरूवातीला उपलब्ध होणार कोरोनाची लस; ‘या’ देशानं केला दावा

Subscribe

२०२१ या वर्षाच्या सुरूवातीलाच कोरोनावरील लस तयार करण्यात येणार असल्याचा दावा एका चिनी कंपनीने केला आहे.

जगभरातील कोरोनाबाधितांच्या एकूण संख्येनं ३ कोटींचा टप्पा ओलांडला असून लाखो लोकांचा कोरोनामुळे मृत्यूही झाला आहे. यादरम्यान अनेक देशांमध्ये कोरोनावरील लस विकसित करण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. जगभरात कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. दरम्यान, चीनच्या औषध कंपनीने असा दावा केला आहे की २०२० पर्यंत कोरोना विषाणूची लस अमेरिकेसह जगभरातील वितरणासाठी सज्ज होणार आहे.

सिनोवॅक कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यीन वीडोंग यांनी याबाबत माहिती दिली. चीनमध्ये कोरोनावर विकसित होणारी लस तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील मानवी चाचणीसाठी तयार आहे. जर ‘कोरोनावॅक’ लस तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील मानवी चाचणीत यशस्वी झाली तर त्या लसीची अमेरिकेत विक्री करण्यासा अमेरिकेतील आरोग्य नियामक मंडळ ‘यूएस फूड अँड ड्रग अॅ़डमिनिस्ट्रेशन’कडे परवानगीसाठी अर्ज केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

सिनोवॅक ही सरकारच्या मालकीची सिनोफार्म असलेल्या लस-विकसनशील चीनच्या पहिल्या चार कंपन्यांपैकी एक आहे. ब्राझील, तुर्की आणि इंडोनेशियातील कोरोनाव्हॅकच्या प्राथमिक चाचण्यांमध्ये २४००० हून अधिक लोक भाग घेत आहेत. सिनोवॅक कंपनीने लसीची चाचणी घेण्यासाठी ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रभाव अधिक आहे, मोठ्या लोकसंख्या आणि मर्यादित संशोधन आणि विकास क्षमता असलेल्या देशांची निवड केली आहे.फार्मास्यूटिकल कंपनीने म्हटले आहे की विकसित होणारी कोरोना व्हायरसची लस २०२१ च्या सुरुवातीस अमेरिकेसह जगभरात वितरणासाठी उपलब्ध व्हायला हवी.

“अमेरिकेसह संपूर्ण जगभरात ही लस उपलब्ध करून देण्याचा आमचा उद्देश आहे,” असेही यीन म्हणाले. यापूर्वी गुरूवारी अमेरिकन कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनने कोरोनावरील लस विकसित करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा पार केल्याचे म्हटले होते. जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीची कोरोनावरील लस ही वैद्यकीय चाचणीच्या अंतिम टप्प्यात पोहोचल्याचंही सांगण्यात आले होते.


कोरोना लसीच्या अंतिम टप्प्यात अमेरिकन कंपनी; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा दावा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -