घरमुंबईकोरोनामुक्त व्यक्तींना आता होतोय हा त्रास!

कोरोनामुक्त व्यक्तींना आता होतोय हा त्रास!

Subscribe

गुलियन बॅरे सिंड्रोम (जीबीएस), फुफ्फुसातील फायब्रोसिस, हृदय किंवा मूत्रपिंडातील समस्या, रक्तवाहिन्यांत गुठळ्या होणे, न्यूमोनिया आणि अशक्तपणा यासारखे आजार त्यांच्यामध्ये उद्भवत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. 

कोरोनासारख्या आजारावर मात केलेल्या रुग्णांना आता अनेक आरोग्य समस्येचा सामना करावा लागत आहे. कोरोनमुक्त रुग्णांना पचनासंबंधीच्या विकारांना मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागत आहे. त्याचबरोबर गुलियन बॅरे सिंड्रोम (जीबीएस), फुफ्फुसातील फायब्रोसिस, हृदय किंवा मूत्रपिंडातील समस्या, रक्तवाहिन्यांत गुठळ्या होणे, न्यूमोनिया आणि अशक्तपणा यासारखे आजार त्यांच्यामध्ये उद्भवत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. 

कोविड संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये पचनसंस्थेसंबंधीत विकार उद्भू लागले आहेत. बरे झालेल्या अनेक रूग्णांना भूक न लागणे किंवा भूक वाढणे, ओटीपोटात वेदना होणे, आंबटपणा, अतिसार आणि उलट्या यासारख्या समस्यांचा सामना करावा लागतो आहे. पाचक प्रणालीमध्ये यकृत, स्वादुपिंड आणि पित्त मूत्राशय यांच्यासह जठर आतड्यांच्या व्यवस्थेचा (जीआय) समावेश आहे आणि कोविडने शरीराच्या इतर अवयवांनाच नव्हे तर जठर आतड्यांच्या व्यवस्थेमध्ये (गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्ट) देखील व्यत्यय येत असल्याचे दिसून येते. जीआय ट्रॅक्टचे कार्यात व्यत्यय आल्याने शरीरातून इलेक्ट्रोलाइट्स आणि द्रवपदार्थ शोषून घेण्याच्या कामात अडथळा निर्माण होतो. गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टच्या रक्तस्त्रावामुळे देखील रुग्णांचा अंत होऊ शकतो. तसेच लहान मुले आणि प्रौढांना मधुमेहाची लागण देखील होऊ शकते. योग्य वेळी उपचार न घेतल्यास ही समस्या अधिक गंभीर होऊ शकते. वेळीच निदान, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला तसेच औषधोपचाराने या विकारांवर मात करता येऊ शकते अशी माहिती पोटविकार तज्ज्ञ डॉ. रॉय पाटणकर यांनी दिली

काय काळजी घ्याल?

रोगप्रतिकार शक्ती वाढवणा-या पदार्थांचे सेवन करा: ताजी फळे, भाज्या, शेंगदाणे आणि सर्व प्रकारचे धान्य अशा संतुलित आहाराचे सेवन करा. जंक फुड, मसालेदार, प्रक्रिया केलेले, खारट आणि चवदार पदार्थ खाणे टाळा. कार्बोनेटेड पेये आणि कोबीवर्गीय भाज्यांचे वन करणे टाळा. फायबरयुक्त आणि हेल्दी फॅट्सचे सेवन करा. आतड्याचे चांगले आरोग्य राखण्यासाठी प्रोबायोटिक्सचे सेवन करा. पाणी पिण्यास विसरू नका आणि हायड्रेटेड रहा. मद्यपान आणि धूम्रपान करू नका, जॉगिंग, धावणे आणि चालणे यासारख्या व्यायामप्रकाराचा दैनंदिन जीवनात समावेश करा. योगा आणि मेडिटेशनचा पर्याय वापरून तणावमुक्त रहा.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -