कोरोनावरील लस विकसित करण्यासाठी अनेक देश प्रयत्नशील आहे. मात्र जीवघेण्या कोरोना व्हायरसचा सर्वाधिक प्रादुर्भाव झाल्याचा फटका अमेरिका, भारत, ब्राझील या देशांना बसला आहे. दरम्यान हा कोरोनाचा कहर सुरू असताना अमेरिकेतून एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. अमेरिकन कंपनी जॉन्सन अँड जॉन्सला कोरोनावरील लस विकसित करण्याच्या दिशेने अजून एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. ज्या स्वयंसेवकाला ही लस देण्यात आली होती, ते वैद्यकीय चाचणीच्या अंतिम टप्प्यात पोहोचले असल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. बुधवारी व्हाईट हाऊसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी याबाबत माहिती दिली.
Johnson & Johnson have announced that their vaccine candidate has reached final stage of clinical trials. This is the 4ht candidate in US who reached final stage of trials. We encourage Americans to enrol in vaccine trials, it'll be a terrific thing for our country: US President pic.twitter.com/K9gQMROn0Z
— ANI (@ANI) September 23, 2020
व्हाईट हाऊसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ट्रम्प म्हणाले “जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीकडून ज्या स्वयंसेवकाला कोरोनावरील लस देण्यात आली होती ते वैद्यकीय चाचणीच्या अंतिम टप्प्यात पोहोचले असल्याचे कंपनीने सांगितले आहे. ते अमेरिकेतील चौथे स्वयंसेवक आहेत जे वैद्यकीय चाचणीच्या अंतिम टप्प्यात पोहोचले आहेत,” तसेच त्यांनी अमेरिकेतील नागरिकांना पुढे येऊन या चाचणीसाठी नोंदणी करण्याचे आवाहनही केले.
We have created the fastest economic recovery in American history. Our approach is pro-science, (Joe) Biden's approach is anti-science. I don't know what their approach is, although a lot of it is copied from what we have done: US President Donald Trump at White House https://t.co/gKMlJkmAV0
— ANI (@ANI) September 23, 2020
यावेळी त्यांनी राजकीय विषयावरदेखील भाष्य करत विरोधी पक्षाचे राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार जो बिडेन यांच्यावरही हल्लाबोल केला. “अमेरिकेत्या इतिहासात आर्थिक सुधारणांना सर्वात वेगाने आम्ही पुढे नेल्या आहेत. आमचा वैज्ञानिक दृष्टीकोन आहे. परंतु बिडेन हे विज्ञान विरोधी दृष्टीकोन असलेलेल व्यक्ती आहेत,” असेही ट्रम्प म्हणाले.