घरदेश-विदेशकर्नाटकात राजकीय भूकंप; कुमारस्वामींचे सरकार कोसळले

कर्नाटकात राजकीय भूकंप; कुमारस्वामींचे सरकार कोसळले

Subscribe

कर्नाटकातील काँग्रेस आणि जनता दलाच्या (सेेक्युलर) १७ आमदारांनी बंडखोरी करून राजीनामा दिल्यानंतर कर्नाटकातील कुमारस्वामी सरकार अल्पमतात आले होते. हे सरकार वाचवण्यासाठी गेले तीन दिवस काँग्रेस आणि जनता दल युद्धपातळीवर प्रयत्न करत होते. मागील गुरुवारपासून विश्वासदर्शक ठरावावर भाषणे होत होती. मात्र मतदान घेतले जात नव्हते. अखेर मंगळवारी रात्री पाऊणेआठच्या सुमारास मतदान झाले. सभागृहात २०४ सदस्य असताना विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने ९९ तर विरोधात १०५ मते पडली. त्यामुळे बहुमत सिद्ध करता न आल्याने कर्नाटकातील कुमारस्वामी सरकार कोसळले. आता भाजप नेते येडीयुरप्पा बुधवारी कर्नाटकाचे राज्यपाल वजूभाई वाला यांना भेटून सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत.

सुमारे चौदा महिन्यांपूर्वी कर्नाटकात झालेल्या विधान सभा निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळाले नव्हते. भाजपला सर्वाधिक १०५ जागा मिळाल्या होत्या. त्या खालोखाल काँग्रेसला ७९ तर जनता दल सेक्युलरला ३७ जागा मिळाल्या होत्या. कर्नाटकात बहुमतासाठी ११३ जागांची आवश्यकता होती. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर एकत्र आले आणि कमी जागा असूनही मुख्यमंत्रीपदाची माळ कुमारस्वामी यांच्या गळ्यात पडली. मात्र कुमारस्वामी केवळ १४ महिनेच मुख्यमंत्रीपदावर बसू शकले. मात्र हे सरकार स्थापनेपासूनच अस्थिर होते. लोकसभा निवडणुकीनंतर कर्नाटकात वेगवान राजकीय घडामोडी घडल्या. काँग्रेस, जेडीएसच्या १७ आमदारांनी राजीनामे दिल्याने सरकार अडचणीत आले.

- Advertisement -

मागील गुरुवारी कर्नाटकाच्या विधान सभेत विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला. मात्र आज मंगळवारी त्यावर मतदान घेण्यात आले. मतदान घेताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कर्नाटकात कलम १४४ लागू करण्यात आले होते. कुमास्वामी यांनी शेवटी अतिशय भावुक भाषण केले. राजकारण माझे श्रेत्र नाही. मी अपघाताने राजकारणात आलो आणि मुख्यमंत्री झालो. माझे श्रेत्र सिनेमा निर्मितीचे आहे. मी एक सिनेनिर्माता आहे. माझ्याकडून कर्नाटकच्या जनतेची सेवा झाली हे मी माझे भाग्य मानतो, असे कुमारस्वामी आपल्या भाषणात म्हणाले. तसेच विश्वासदर्शक ठरावावर मतदानासाठी मी तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.

त्यानंतर संध्याकाळी ७.४० वाजता कुमारस्वामींनी विश्वासदर्शक ठराव मांडला.तेव्हा सभागृहात २०४ सदस्य उपस्थित होते. विधानसभेतील उपस्थित आमदारांची मोजणी करण्यात आली आणि नंतर विश्वासदर्शक ठरावावर मतदान घेण्यात आले. १७ बंडखोर आमदार विधानसभेत गैरहजर असल्याने बहुमताचा आकडा १०३ वर आला. मात्र कुमारस्वामींना बहुमताचा आकडा गाठता आला नाही. ठरावाच्या बाजूने केवळ ९९ मते पडल्याने कुमारस्वामी सरकार कोसळले. तर ठरावाच्या विरोधात १०५ मते पडली. भाजपचे एकही मत फुटले नाही.

- Advertisement -

भाजपचा जल्लोष

कर्नाटक सरकार पडल्यानंतर स्पष्ट झाल्यानंतर भाजपच्या आमदारांनी सभागृहात एकच जल्लोष केला. भाजपचे आमदार वेलमध्ये आले. त्यांनी भाजप नेते येडीयुरप्पा यांचे अभिनंदन केले. त्याचवेळी विधान सभेच्या बाहेर असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडत आणि घोषणा देत आनंद साजरा केला.

आज करणार दावा

कर्नाटकात सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी भाजपचे विधान सभेचे नेते येडियुरप्पा हे बुधवारी राज्यपालांना भेटणार आहेत. त्यानंतर ते सरकार स्थापनेचा दावा करील.

विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी कर्नाटक विधानसभेतील बलाबल

  • एकूण सदस्य : २०४
  • भाजप : १०५

काँग्रेस-जेडीएस: ९९

कर्नाटक विधान सभेतील पक्षीय बलाबल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -