घरताज्या घडामोडीकाँग्रेस नेत्याची मुख्यमंत्र्यांविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका

काँग्रेस नेत्याची मुख्यमंत्र्यांविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका

Subscribe

महाविकास आघाडीत काँग्रेस आमदार शिवसेनेच्या मांडीला मांडी लावून बसललेले असताना काँग्रेस नेते नसीम खान यांनी चक्क मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. महाविकास आघाडी सरकारला काँग्रेसचा पाठिंबा देण्याचा भाग वेगळा आणि न्याय मिळवण्याचा प्रयत्न करणे हा वेगळा भाग असल्याचे नसीम खान यांनी स्पष्ट केले आहे. उद्धव ठाकरे, अनिल परब आणि त्यांच्या इतर पदाधिकार्‍यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी प्रचाराची वेळ संपलेली असतानाही सभा घेत आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप नसीन खान यांचा आरोप आहे.

नसीम खान म्हणाले, हे प्रकरण २०१९ मधील आहे. २०१९ च्या निवडणुका सुरू असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, अनिल परब आणि सेनेच्या उमेदवारांनी २१ ऑक्टोबरला मतदान असताना आणि १९ ऑक्टोबरला प्रचार बंद झाला असतानाही २० ऑक्टोबरला रात्री ९ वाजता सभा घेतली, पदयात्रा काढली. त्यामुळे आदर्श आचारसंहितेचा भंग झाला. त्यावेळी आम्ही याबाबत तक्रार केली होती. मात्र, त्यावर जी कारवाई होणे अपेक्षित होते ती झाली नसल्याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या पूढची कारवाई म्हणून आम्ही सर्वोच्च न्यायालयात एसएलपी दाखल केली आहे, असे नसीम खान म्हणाले.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -