घरताज्या घडामोडीकाँग्रेस मजबूत व्हावा हीच माझी इच्छा

काँग्रेस मजबूत व्हावा हीच माझी इच्छा

Subscribe

नितीन गडकरी यांचे वक्तव्य चर्चेत

काँग्रेस पक्ष कमकुवत होत असून देशातील मुख्य विरोधी पक्षाची जागा प्रादेशिक पक्ष घेत आहेत, हे लोकशाहीसाठी चांगले लक्षण नाही. त्यामुळे सलग निवडणुकीत पराभूत होणारी काँग्रेस पुन्हा मजबूत व्हावी आणि पक्षाचे नेते निराश होऊन पक्ष सोडू नयेत, हीच आपली इच्छा आहे, असे मत केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे.
एका कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले की, लोकशाही दोन चाकांवर चालते- सत्ताधारी आणि विरोधक. प्रबळ विरोधी पक्ष ही लोकशाहीची गरज आहे, त्यामुळे काँग्रेस मजबूत असावी अशी माझी इच्छा आहे. त्याचवेळी काँग्रेस कमकुवत असताना त्याचे स्थान प्रादेशिक पक्ष घेत आहेत, जे लोकशाहीसाठी चांगले नाही. त्यामुळे काँग्रेस विरोधी पक्षाची जागा घेण्यासाठी मजबूत झाला पाहिजे, अशी इच्छा गडकरींनी बोलून दाखवली. जे काँग्रेसच्या विचारसरणीचे पालन करतात, त्यांनी पक्षासोबत राहून खंबीर राहावे. पराभवाने खचून न जाता त्यांनी काम करत राहावे. पराभव झाला तरी एक दिवस विजयही होणारच.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -