घरदेश-विदेशसेवाग्रामहून सुरू करणार दुसरे स्वातंत्र्य युद्ध

सेवाग्रामहून सुरू करणार दुसरे स्वातंत्र्य युद्ध

Subscribe

२ ऑक्टोबर रोजी काँग्रेस कार्य समितीची बैठक होणार आहे. गांधी जयंतीनिमित्त सेवाग्राम येथून स्वातंत्र्याचे दुसरे युद्ध सुरू करणार असल्याची घोषणा काँग्रेस नेते रणदीप सुर्जेवाला यांनी आज नागपुरात केली.

देशावर दीडशे वर्ष राज्य करणारे इंग्रज आणि भाजप यात जास्त फरक नाही. भाजपच्या जोखडातून देशाला मुक्त करण्यासाठी काँग्रेस कटिबद्ध आहे. त्यासाठी गांधी जयंतीनिमित्त सेवाग्राम येथून स्वातंत्र्याचे दुसरे युद्ध सुरू करणार असल्याची घोषणा काँग्रेस नेते रणदीप सुर्जेवाला यांनी आज नागपुरात केली. स्थानिक पत्रकारसंघात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी सुर्जेवाला म्हणाले की, देशात सध्या लूट, खोटेपणा आणि भेदभावाचे वातावरण आहे. स्वातंत्र्यापूर्वी इंग्रज आणि आता भाजप सरकार लुटते आहे. माल्या, मोदी सारख्या लुटारूंना देशातून पळून जाण्याची मुभा दिली जातेय. जसे इंग्रज भारतीय मूल्यांची पायमल्ली करायचे तसेच भाजप लोकशाही नितीमूल्य पायदशी तुडवते आहे. इंग्रजांनी चंपारणच्या शेतकऱ्यांना निळाची शेती करण्यास बाध्य केले होते. तर भाजपच्या धोरणांमुळे आज शेतकरी आत्महत्येस प्रवृत्त होताना दिसून येतो. इंग्रजांच्या काळात मुठभर श्रीमंतांच्या हिताचे रक्षण व्हायचे. वर्तमानातही मुठभर उद्योगपतींना सर्व सोई-सवलती दिल्या जाताहेत. प्रसीद्धी माध्यमांवर दडपण असून केवळ सरकारची स्तुती करणाऱ्या माध्यमांकडेच जाहिरातीचा ओघ चालल्याचा आरोपही त्यांनी केला. यावेळी पत्रकार परिषदेला खा. अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार यशोमती ठाकूर प्रामुख्याने उपस्थित होते.

- Advertisement -

दुसऱ्या स्वातंत्र्य युद्धाची नांदी काँग्रेसने यापूर्वी इंग्रजांच्या दास्यत्वातून मुक्तीसाठी लढा दिला होता. आता भाजपच्या शासनातून मुक्त करण्यासाठी दुसरे स्वातंत्र्य युद्ध पुकारणार आहे. सेवाग्रामच्या बापू कुटी पासून ३०० मीटर अंतरावरील महादेव भावनात २ ऑक्टोबर रोजी काँग्रेस कार्य समितीची बैठक होणार आहे. यात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह पक्षातील अनेक ज्येष्ठ नेते सहभागी होणार असल्याचे सुर्जेवाला यांनी सांगितले. सेवाग्राम येथे दुपारी १२ वाजाता बैठक होणार असून ही बैठक सुमारे २ तास चालेल. त्यानंतर ३ वाजता पदयात्रा काढण्यात येईल. तर ४.३० वाजता राहुल गांधी जनसभेला संबोधीत करतील. दरम्यान काँग्रेस कार्य समितीच्या बैठकीचा अजेंडा सांगण्यास सुर्जेवाला यांनी नकार दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -