घरमहाराष्ट्रराफेल डिल; कुठं तरी पाणी मुरतंय! - अजित पवार

राफेल डिल; कुठं तरी पाणी मुरतंय! – अजित पवार

Subscribe

राफेल प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शरद पवार यांनी भलामन केल्यामुळे पक्षावर टीका होत असताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मात्र या प्रकरणात पाणी कुठं तरी मुरतंय! अशा संशय व्यक्त केला आहे.

राफेल डिलमध्ये घोटाळा झाला, असा आरोप काँग्रेससहीत विरोधी पक्षांनी केला. शरद पवार यांनी मात्र राफेल घोटाळ्यात मोदींच्या हेतूबाबात जनतेच्या मनात संशय नसल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे एकच गदारोळ झाला होता. शरद पवार यांच्या या वक्तव्यामुळे नाराज होऊन पक्षाचे खासदार तारिक अन्वर यांनी राजीनामा दिला. त्यानंतर आता अजित पवार यांनी राफेल प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राफेल विमाने वाढीव दराने विकत घेतली असल्याचे आरोप होत आहेत. फ्रांसचे माजी राष्ट्राध्यक्ष यांनीसुद्धा सरकारच्या विरोधात वक्तव्ये केलेली आहेत. त्यामुळे कुठं तरी पाणी मुरतंय, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी आज पिंपरी चिंचवड येथे केले. पण जोपर्यंत भक्कम पुरावा समोर येत नाही, तोपर्यंत त्याबद्दल मत व्यक्त करणे उचित दिसणार नाही. बातमीतच तथ्य नसेल आणि मी माझं मत व्यक्त केले तर, ‘एकेकाळी उपमुख्यमंत्री असलेला बातमी न येता अश्या प्रकारची वक्तव्य करतात’, असा आरोप केला जाईल. त्यामुळे मी आत्ता त्याबद्दल बोलणार नाही. आल्यावर मी माझं मत स्पष्ट करेल, अशी भूमिका अजित पवार यांनी स्पष्ट केली.

मोदींच्या हेतूबाबत लोकांच्या मनात शंका नाही; पवारांचा विरोधकांना चकवा

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार यांनी खासगी वाहिनीवर केलेल्या वक्तव्याबद्दल गैरसमज पसरवले गेले आहेत. या प्रकरणी पक्षाचे खासदार प्रफुल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. या राष्ट्रीय पातळीवरील घडामोडी आहेत. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर काम करणारेच राष्ट्रवादीचे मान्यवर उत्तर देऊ शकतात. महाराष्ट्रातील घडामोडींवर माझी मत मी मांडत असतो, असेही अजित पवार यांनी सांगितले.

- Advertisement -

अजित पवार पुढे म्हणाले की, आमची भूमिका आहे की, पाचशे कोटींचे विमान दीड हजार कोटींना घेतले जाते. त्यात ४१ हजार कोटींचा घोटाळा झाला आहे, अशा पद्धतीने आरोप होत आहेत. त्याबद्दल बाकीचे सर्व चर्चा करतात पण देशाचे प्रमुख बोलत नाहीत, वक्तव्य करत नाहीत. त्याचबरोबर फ्रान्सच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी काही वक्तव्य केलेली आहेत, ते आपल्या सर्वांच्या ऐकण्यात आलेली आहेत. राफेल खरेदीच्या बाबतीमध्ये निश्चितपणे केंद्र सरकार आणि केंद्र सरकारचे संबंधित व्यक्ती संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले पाहायला मिळत आहेत. अनेक तज्ज्ञ लोकांनी भूमिका मांडल्या आहेत. रिलायन्स कंपनीला काम मिळालेले आहे. त्यांना कुठल्याच प्रकारचा अनुभव नाही. हे कागदोपत्री सिद्ध झाले, हे कोणी नाकारू शकत नाही, अशीही टीका पवार यांनी केली.

संभाजी भिडेंचे ते वक्तव्य अपमानजनक

संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पेक्षा मनू श्रेष्ठ होता. हे म्हणण्याच्या पलीकडचे धाडस भाजपच्या काळात संभाजी भिडे यांच्या सारख्या व्यक्तींकडून होत आहे. हे महाराष्ट्राचे दुर्दव आहे. साधू संतांची भूमी म्हणून ओळख असणाऱ्या महाराष्ट्राचा आणि वारकरी संप्रदायाचा हा अपमान असल्याची टीका अजित पवार यांनी केली.

राफेल प्रकरणी सरकार दोषीच; मी मोदींचे समर्थन केले नव्हते – शरद पवार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -