घरदेश-विदेशकाँग्रेसने शेअर केला अटल बिहारी वाजपेयींचा राजीव गांधीबद्दलचा 'तो' व्हिडीओ,

काँग्रेसने शेअर केला अटल बिहारी वाजपेयींचा राजीव गांधीबद्दलचा ‘तो’ व्हिडीओ,

Subscribe

नवी दिल्ली – भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधींच्या ७८व्या जयंतीनिमित्त सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली. या निमित्ताने काँग्रेसने माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अटल बिहारी वाजपेयी आजारी असताना त्यांना राजीव गांधी यांनी कशी मदत केली होती, याबद्दल सांगताना दिसत आहेत.

व्हिडीओतमध्ये काय? –

- Advertisement -

किडनी आजारावरील उपचारासाठी डॉक्टरांनी मला अमेरिकेला जाण्याचा सल्ला दिला होता. पण पैशांची जुळवाजुळव करणे शक्य न झाल्यामुळे मला अमेरिकेला जाणे कठीण झाले होते. ही बाब राजीव गांधींना समजली त्यांनी मला फोन केला त्यानंतर अमेरिकेत जाणाऱ्या शिष्टमंडळात माझा समावेश केला. राजीव गांधींच्या या निर्णयानंतर मी शिष्टमंडळाचा एक भाग झालो. माझ्यावरील उपचाराचा खर्च केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यात आला. पुढे मी पूर्ण बरा झालो, असे वाचपयी या व्हिडीओमध्ये सांगताना दिसत आहेत.

- Advertisement -

राहुल गांधींनी वाहिली आदरांजली –

राहुल गांधी यांनी वडील राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली. त्यांनी ट्विटरवर राजीव गांधी यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच पप्पा तुम्ही कायम माझ्यासोबत आहात. तुम्ही देशासाठी जे स्वप्न पाहिले आहे, त्याला पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन, असे म्हणत राहुल गांधी यांनी राजीव गांधी यांना आदरांजली अर्पण केली.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -