घरक्राइमटेम्पो ट्रॅव्हल्समधून सुरू होती गोवंशाची वाहतूक, अजित पवारांच्या दौऱ्यातील बीडएस पथकाची मोठी...

टेम्पो ट्रॅव्हल्समधून सुरू होती गोवंशाची वाहतूक, अजित पवारांच्या दौऱ्यातील बीडएस पथकाची मोठी कारवाई

Subscribe

अमरावती – सारवाडी जवळ परडी पाट्यावर सस्ताकडेला बंद स्थितीत मिनी ट्रॅव्हल्समधून कत्तलीसाठी गोवंशाची वाहतूक सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या अमरावती दौऱ्यानिमित्त बंदोबस्तावर असलेल्या वर्ध्याच्या बीडीएस पथकाने पाहणी ही बाब समोर आणली आणि त्या गोवंशांची सुटका केली. दरम्यान आरोपी पसार झाले . ही कारवाई सकाळी 8.30 च्या सुमारास करण्यात आली.

वर्ध्यातील बॉम्ब शोधक पथक विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या अमरावती दौऱ्यानिमित्त बंदोबस्तावर होते. यावेळी कारंजाकडून तळेगावकडे येत असताना सारवाडी नजीकच्या पारडी फाट्याजवळ रस्त्याकडेला एम.एच. 06 के.0921 गाडी उभी होती. पथकातील कर्मचाऱ्यांना संशय आल्यामुळे त्यांनी त्या मिनी ट्रॅव्हल्सची पाहणी केली. यावेळी त्यांना मिनी ट्रॅव्हल्समध्ये गोवंश कोंबन भरल्याचे दिसून आले. या ट्रॅव्हल्समध्ये 12गोवंश जिवंत तर दोन मृत गाई आढळून आल्या. याची माहीत त्यांनी तत्काळ तळेगाव पोलीस ठाण्याला दिली. पोलीसांनी घटनास्थळी पंचनामा करून ट्रॅव्हल्स ताब्यात घेत गोवंशाना टाकरखेड गोशाळेत पाठविले.

- Advertisement -

दरम्यान पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक आशिष गजभियेंच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पवन भांबुरकर, परवेज खान, मनोज असोले, सुधीर डांगे, अमोल मानमोडे, विजय उईके करत आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -