घरदेश-विदेशचोरी पकडी गई; काँग्रेसने भाजपला सुनावले

चोरी पकडी गई; काँग्रेसने भाजपला सुनावले

Subscribe

'चौकीदाराची चोरी रंगेहाथ पकडली गेली', असा आरोप काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केला आहे. आज सर्वोच्च न्यायालयात राफेल प्रकणावर महत्त्वाची सुनावणी झाली. या सुनावणीनंतर काँग्रेसने तातडीने पत्रकार परिषद घेत मोदींवर हल्लाबोल केला.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राफेल प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत येताना दिसत आहे. राफेल प्रकरणी सुप्रीम कोर्टाने १३ डिसेंबर २०१८ रोजी अंतिम निर्णय दिला होता. परंतु, या निर्णयावर फेरविचार याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान, सरकारच्या वतीने महाधिवक्ता के. के. वेणूगोपाल यांनी संरक्षण मंत्रालयातून राफेलच्या करारासंबंधी महत्त्वाचे कागदपत्रे चोरीला गेली असल्याचे माहिती दिली. याच मुद्द्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने तातडीने पत्रकार परिषद घेऊन ‘चौकीदाराची चोरी रंगेहाथ पकडली गेली’, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केला आहे.

‘मोदींनी देशाची दिशाभूल केली’

राफेल प्रकरणी आज कोर्टात सुनावणी सुरु आहे. या सुनावणी दरम्यान, सरकारची बाजू मांडणारे महाधिवक्ता के. के. वेणूगोपाल यांनी दिलेल्या माहितीनंतर काँग्रेसने तातडीने पत्रकार परिषद बोलावली. या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे प्रवक्ता रणदीप सुरजेवाल यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली. यावेळी ते म्हणाले की, ‘चौकीदाराची चोरी रंगेहाथ पकडली गेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राफेल खरेदीत भ्रष्टाचार केला आहे. मोदींनी देशाची दिशाभूल केली आहे. जेव्हा काँग्रेस सरकार १२६ विमाने खरेदी करत होते तेव्हा त्यामध्ये ट्रान्सफर ऑफ टेक्नोलॉजीचा सहभाग होता. मात्र, मोदी सरकारच्या या करारामध्ये ट्रान्सफर ऑफ टेक्नोलॉजी समाविष्ट करण्यात आलेली नाही. ही मोदींची तिसरी चोरी आहे.’ या संदर्भात सुरजेवाल यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन ट्विट देखील केले आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -