घरमनोरंजनएका अनोख्या राजकन्येची गोष्ट

एका अनोख्या राजकन्येची गोष्ट

Subscribe

११ मार्चपासून सोनी मराठीवर एका राजकन्येचा प्रवास प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. अभिनेता आदीनाथ कोठारेने या मालिकेची निर्मीती केली आहे.

आजपर्यंत आपल्याला परिकथेतली, आजीने सांगीतलेल्या गोष्टींमधली नाजूक, गोड गोड राजकन्या माहित आहे. पण पहिल्यांदाच सोनी मराठीवरील एक होती राजकन्या या मालिकेतून एक अगळी वेगळी राजकन्या तुमच्या भेटीला येणार आहे. ११ मार्चपासून या राजकन्येचा प्रवास सोनी मराठीवर प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

शेगावहून मुंबईत आलेल्या राजकन्येची म्हणजेच अवनीची ही गोष्ट. डॉक्टरांचा पांढरा कोट अंगात अडकवण्याचे स्वप्न बघणाऱ्या अवनीला काही कारणास्तव पोलिसांची खाकी वर्दी घालावी लागते. 21 व्या शतकातल्या त्या प्रत्येक स्त्री चं प्रतिनिधीत्त्व करणाऱ्या अवनीने बाबांचं छत्र डोक्यावरून निसटल्यानंतर घराची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली आहे. या अवनीच हे नवं विश्व कसं असेल? मुंबईत आल्यावर तीचं आयुष्य बदलेलं का? तिच्या आयुष्यात येणारा राजकुमार कोण असेल या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला प्रत्येक एपिसोडमधून उलगडत जाणार आहे.

- Advertisement -
new serial on sony marathi
एक होती राजकन्या

या मालिकेची निर्मीती आदीनाथ कोठारे म्हणजेच कोठारे व्हिजनची आहे. जीजीच्या रूपाने एका राजकन्येचा माझ्या आयुष्यात प्रवेश झाला आहे. त्यामुळे ही राजकन्या माझ्या खूप जवळची आहे. अवनीच्या रूपात असेल्या या राजकन्येचा प्रवास तुम्हाला नक्की आवडेल असं मत आदीनाथने यावेळी व्यक्त केलं. या मालिकेचं शिर्षक गीतही उत्तम जमून आलं आहे. अश्विनी शेंडे यांचे सुंदर बोल असणाऱ्या शीर्षकगीताला प्रसिध्द संगीतकार अशोक पत्की यांच संगीत लाभलं आहे. देवकी पंडीत आणि अजय पुरकर यांचा आवाज या शिर्षकगीतात ऐकू येणार आहे.

ही मालिका माझ्यासाठी खूपच महत्त्वाची आहे. या मालिकेप्रमाणे माझाही वेगळा प्रवास सुरू होत आहे. या आधी जैडी या पात्रावर प्रेक्षकांनी खूप प्रेम केलं. आता ही अवनीही तुम्हाला आवडेल याची खात्री मला आहे. अवनी ही तुमच्यातलीच एक आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी माझ्यावर असचं प्रेम करत रहा, आणि नक्की मालिका बघा.– किरण ढाणे, अभिनेत्री

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -