घरदेश-विदेशभारतीय तरुणाने अॅमेझॉनला घातला ३० लाखांचा गंडा

भारतीय तरुणाने अॅमेझॉनला घातला ३० लाखांचा गंडा

Subscribe

जगातील मोठी ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनला भारतीय तरुणाने ३० लाखांचा गंडा घातला आहे. इंदूर येथील तरुणाने रिफंडचे कारण देत गंडा घातला आहे.

लोकांनी दिलेली ऑर्डर घरपोहच करणारी जगातील सर्वात मोठी ई कॉमर्स कंपनी अॅमेझॉनला एका भारतीय तरुणाने ३० लाखांचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. २७ वर्षीय या तरुमाला इंदूर येथून अटक करण्यात आली आहे. या तरुणाने तब्बल ३० लाख रुपयांचा गंडा घातला असल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. अॅमेझॉनमधून मागवलेल्या पार्सल हे परत करुन कंपनी कडून पैसे परत वसूल केले जात होते. या तरुणाने वेगवेगळे अकाउंट बनवून अेकदा ही फसवणूक केली. अखेर कंपनीने याची माहिती मिळताच कंपनीने पोलिसांकडे तक्रार केली. यानंतर पोलिसांनी सापळा रचून या आरोपीला अटक केली आहे.

असा करत होता चोरी

इंदूरचे पोलीस अधिक्षक जितेंद्र सिंग यांनी दिलेल्या माहिती नुसार मोहम्मद माहुआला असे या तरुणाचे नाव आहे. तो मूळ इंदूर येथील रहिवासी आहे. त्याने विविध नावांनी अकाऊंट उघडून अॅमेझॉन मधून पार्सल मागवले होते. मोहम्मद अॅमेझॉनवरून महागड्या मोबाईलची ऑर्डर देत होता. पार्सल आल्यावर बॉक्समध्ये मोबाईल नसल्याची तक्रार तो कंपनीला करत होता. अॅमेझॉन कंपनीने पाठवलेले फोन हा तरुण लोकल बाजारात विकत होता. असे अनेक फोन विकून त्याने तब्बल ३० लाख रुपयांचा गंडा घातला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -