घरदेश-विदेश'कुलभूषण दबावाखाली असल्याचे जाणवले'; उप उच्चायुक्तांची प्रतिक्रिया

‘कुलभूषण दबावाखाली असल्याचे जाणवले’; उप उच्चायुक्तांची प्रतिक्रिया

Subscribe

भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी कमांडर कुलभूषण जाधव यांची आज, सोमवारी भारताच्या उप उच्चायुक्तांशी भेट घडवून आणण्यात आली. तब्बल दोन तास त्यांनी कुलभूषण यांच्याशी बातचीत केली.

भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी कमांडर कुलभूषण जाधव यांची आज, सोमवारी भारताच्या उप उच्चायुक्तांशी भेट घडवून आणण्यात आली. तब्बल दोन तास त्यांनी कुलभूषण यांच्याशी बातचीत केली. त्यानंतर भारताचे उप उच्चायुक्त गौरव अहलूवालिया यांनी दिलेली पहिली प्रतिक्रिया म्हणजे कुलभूषण खुपच दबावाखाली बोलत असल्याचे दिसले. याबाबत सविस्तर अहवाल मिळाल्यानंतर ते पुढील पावलं उचलतील, अशी माहिती उप उच्चायुक्तांनी दिली आहे.

- Advertisement -

दोन तास कुलभूषण यांच्याशी बातचीत

कुलभूषण जाधव यांना हेरगिरी आणि विध्वंसक कृत्ये करण्याच्या आरोपावरून दोषी ठरवून लष्करी न्यायालयाकडून फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दरम्यान, कॉउन्सिलर अॅक्सेस देण्याच्या पाकिस्तानच्या निर्णयानंतर सोमवारी भारताच्या उप उच्चायुक्त गौरव अहलूवालिया यांनी कुलभूषण जाधव यांची भेट घेतली. दोघांमध्ये जवळपास दोन तास चर्चा झाली. ही भेट इस्लामाबादमधील एका अज्ञात ठिकाणी झाल्याचे पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्देशाचे पालन 

कुलभूषण यांना २०१६ साली अटक झाल्यानंतर पहिल्यांदाच सुमारे तीन वर्षांनंतर कुलभूषण यांना कॉउन्सिलर अॅक्सेस मिळाला आहे. दि हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताने हे प्रकरण नेल्यानंतर न्यायालयाने कुलभूषण यांना तातडीने कॉउन्सिर अॅक्सेस देण्याचे निर्देश पाकिस्तानला दिले होते. त्यानुसार आज कुलभूषण यांच्याशी भारताच्या उप उच्चायुक्त यांची भेट झाली आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने फटकारल्यानंतर पाकिस्तानने कुलभूषण यांना कॉउन्सिलर अॅक्सेस देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आज, दुपारी साजेबारा वाजता भारताचे उप उच्चायुक्त यांनी कुलभूषण यांची भेट घेतली. या भेटीत उप उच्चायुक्त यांनी कुलभूषण यांना पाकिस्तानातील तुरुंगात देण्यात येणाऱ्या वर्तणुकीबाबत माहिती घेतली. तसेच त्यांना येणाऱ्या समस्या, त्यांच्या मदतीबाबतच्या मागण्या समजून घेऊन भारताची पुढील रणनीती ठरण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -