घरमहाराष्ट्रनाशिकमी आहे तिथेच खुश.. - छगन भुजबळ

मी आहे तिथेच खुश.. – छगन भुजबळ

Subscribe

सेना प्रवेशाबाबत भुजबळांचे स्पष्टीकरण

राज्यभरातील काँग्रेस तसेच राष्ट्रवादीचे अनेक नेते व विद्यमान आमदारांनी सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेचा रस्ता धरला आहे. आता राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे देखील पुन्हा स्वगृही म्हणजेच शिवसेनेत परतणार असल्याच्या चर्चेला वेग आला आहे. याबाबत मौन धारण करणारया भुजबळांनी आपल्या सेना प्रवेशाबाबत खुलासा करतांना प्रवेशाबाबतच्या चर्चा या निराधार असून आपण आहे तिथेच खुश असल्याचे स्पष्टीकरण देत पक्षांतर करणार नसल्याचे सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून भुजबळ हे शिवसेनेत प्रवेश करणार या चर्चेने वेग धरला. पक्षापासून राखलेले अंतर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नाशिकमधील संवाद यात्रेदरम्यान भुजबळ यांची असलेली गैरहजेरी यामुळे भुजबळ यांच्या पक्षबदलाच्या चर्चेने आणखीच जोर पकडला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रविवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास भुजबळ हे शिवसेनेत प्रवेश करणार, अशा प्रकारच्या पोस्टही सोशल मिडीयावर व्हारयल झाल्या. त्यामुळे राष्ट्रवादीसह शिवसेनेतील पदाधिकरयांत चलबिचल सुरू झाली. शुक्रवारपासून नाशिक दौरयावर असलेल्या भुजबळांनीही प्रसिध्दी माध्यमांपासून अंतर राखत याबाबत मौन बाळगणेच पसंत केले.

- Advertisement -

आपल्या नाशिक दौरयात त्यांनी राष्ट्रवादी पदाधिकारयांनाही भेटणे टाळले. शनिवारी दुपारी ते नाशिकहून मुंबईला रवाना झाल्याने या चर्चेला अधिकच पुष्टी मिळाली. मात्र मुंबईतील घरी दरवर्षी गणपती असल्याने कुटुंबीय मुंबईत असल्याचा खुलासा भुजबळ परिवाराकडून करण्यात आला. माझंगाव येथील गणेश मंडळाचे भुजबळ अध्यक्ष असल्याने आज भुजबळांनी गणेशस्थापनेनंतर आपले मौन सोडत सेना प्रवेशाविषयी खुलासा करतांना सांगितले की, या चर्चेत तथ्य नाही मी आहे तिथेच खुश असल्याचे सांगत पक्षांतराचे वृत्त फेटाळून लावले.

भुजबळांच्या प्रवेशाला विरोधाचे विघ्न

भुजबळांनी सेनेत प्रवेश केला तर आपले राजकिय अस्तित्व धोक्यात येईल या भीतीने नाशिकमधील सेना नेत्यांनी थेट मातोश्रीवर धाव घेत भुजबळांच्या प्रवेशाला विरोध दर्शवला. तर भुजबळ सेनेत आल्यास महाजन यांच्या नाशिकमधील वर्चस्वाला धक्का बसेल या भीतीने भुजबळ विरोधी गटाला भाजपमधूनही रसद पुरवली जात असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाबाबत सेनेने हरकत घेतल्याची चर्चा आहे तर भाजपनेही भुजबळांच्या प्रवेशाबाबत हरकत नोंदवल्याच्या वृत्ताने राणे आणि भुजबळांच्या पक्षांतरात विघ्न आल्याचे बोलले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -