घरताज्या घडामोडीLive Update :भाजपा आमदार प्रसाद लाड यांच्या घराजवळून दोन जणांना घेतले ताब्यात

Live Update :भाजपा आमदार प्रसाद लाड यांच्या घराजवळून दोन जणांना घेतले ताब्यात

Subscribe
भाजपा आमदार प्रसाद लाड यांच्या घराजवळून दोन जणांना ताब्यात घेण्यात आले, रेकी करत असल्याच्या संशयावरून घेतले ताब्यात, त्यांच्याकडून तीन मोबाईल आणि एक पिस्तुल मिळाल्याची माह

मुंबईत आज 5 हजार 956 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद


अबुधाबी विमानतळावर झालेल्या हल्ल्यात दोन भारतीयांचा मृत्यू

- Advertisement -

किरण माने यांच्या पत्नीची राज्य महिला आयोगाकडे तक्रार


प्रताप सरनाईक यांच्याविरोधात भाजप दाखल करणार जनहित याचिका

- Advertisement -

एन.डी.पाटील यांनी अभ्यासपूर्ण भाषणाने सभागृह गाजवले, त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला, तत्वनिष्ठ आणि निस्वार्थी नेता हरपला- शरद पवार


प्रफुल पटेल आणि जितेंद्र आव्हाड उद्या गोव्यात जाणार- नवाब मलिक


पंजाब विधानसभेची निवडणूक २० फेब्रुवारी होणार, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.


शेकापचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक एन.डी.पाटील यांचं निधन झालं. त्यामुळे त्यांच्या अंतिम दर्शनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार कोल्हापूरकडे रवाना झाले आहेत.


ओबीसी आरक्षणावरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी लांबणीवर गेली आहे. बुधवारी १९ जानेवारीला ओबीसी आरक्षणावर सुनावणी होणार आहे.


शेकापचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक एन.डी.पाटील यांचं निधन झालं आहे. कोल्हापुरात उपचारादरम्यान एन.डी.पाटील यांनी वयाच्या ९३वर्षी अखेरचा श्वास घेतला.


संतोष परब हल्लाप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांचा जामीन नाकारला आहे.


संतोष परब हल्लाप्रकरणी भाजप आमदार नितेश राणेंच्या अटकपूर्व जामिनावर थोड्याच वेळात निर्णय होणार आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळाचं उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नितेश राणे पत्रकार परिषद घेणार आहेत.


सचिन वाझे आणि परमबीर सिंह यांच्यातील बैठकीवरून ४ पोलिसांना कारणे दाखवा अशी नोटीस बजावण्यात आली आहे. चांदीवाल आयोगाच्या सुनावणी दरम्यान सचिन वाझे आणि परमबीर सिंह यांच्या गुफ्तगू झाली होती.


राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी पुण्यातील मेट्रोच्या कामाची पाहणी केली. पाहणीदरम्यान फुगेवाडी ते संत तुकाराम नगरपर्यंत मेट्रोतून प्रवास केला.


समाजसेविका आणि पद्मश्री विजेत्या शांती देवी यांचे ओडिसामधील राहत्या घरी निधन झाले.


तामिळनाडूत १५ ते १८ वयोगटातील १०० टक्के शाळकरी विद्यार्थ्यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे, असे तामिळनाडूच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.


औरंगाबादमध्ये व्यापारी महासंघाची तातडीची बैठक सुरू झाली आहे. कोरोना नियमांआडून प्रशासनाची मनमानी सुरू असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे.


मुंबईतील आयआयटीच्या हॉस्टेलमधील २६ वर्षीय विद्यार्थ्यांने नैराश्येतून ७व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. आज सकाळी ५ वाजता ही आत्महत्येची घटना घडली. आत्महत्या करताना लिहिलेल्या सुसाईट नोटमध्ये नैराश्येतून आत्महत्या केल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. याप्रकरणी पवई पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.


शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांना कोरोनाची लागण झाली आहे. पुढील उपचारासाठी संजय राठोड यांनी मुंबईला हवलण्यात आले आहे. माहितीनुसार, त्यांची ऑक्सिजनची पातळी कमी झाली आहे.


ज्येष्ठ नेते प्राध्यापक एन.डी.पाटील यांची प्रकृती गंभीर असल्याचे समोर आले आहे. वातावरण बदलामुळे कणकण वाटत असल्यामुळे त्यांना कोल्हापूरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एन.डी पाटलांना कोरोनाची लागण झाली होती.


ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सरकारच्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.


डोंबिवलीमध्ये आज सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत पाणीपुरवठा बंद असणार आहे. जलशुद्धीकरण केंद्रातील मुख्य जलवाहिनीच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामानिमित्ताने पाणी पुरवठा बंद करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.


प्रसिद्ध कथ्थक नर्तक पंडित बिरजू महाराज यांचं निधन झालं आहे. ८३व्या वर्षी पंडित बिरजू महाराज यांनी अखेरचा श्वास घेतला.


भाजप आमदार नितेश राणेंच्या अटकपूर्व जामिनावर आज निर्णय होणार आहे. नितेश राणेंच्या अटकपूर्ण जामिनावरील हायकोर्टातील सुनावणी पूर्ण होणार असून निकाल येईपर्यंत अटकेपासून दिलासा कायम आहे.


गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची अंतिम यादी १९ जानेवारीला जाहीर होणार आहे, अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -