घरदेश-विदेश...तर आणखी स्फोट घडवून आणू; दिल्ली स्फोटक प्रकरणाची जबाबदारी 'या' दहशतवादी संघटनेनं...

…तर आणखी स्फोट घडवून आणू; दिल्ली स्फोटक प्रकरणाची जबाबदारी ‘या’ दहशतवादी संघटनेनं स्वीकारली

Subscribe

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला हे पत्र मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांनी एनआयएच्या विशेष पथकाची भेट घेऊन तपास सुरू केला आहे.

प्रजासत्ताक दिनापूर्वी दिल्लीतील गाझीपूर फूल मार्केट स्फोटकांनी उडवण्याचा कट मुजाहिदीन गजवात हिंद या दहशतवादी संघटनेने रचला होता. अल कायदाशी संलग्न असलेल्या या मुजाहिदीन गजवात हिंद या दहशतवादी संघटनेने टेलिग्रामवर पत्र पाठवून या आयईडी बॉम्ब स्फोट हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

या पत्रात दहशतवादी संघटनेने लिहिले की, “MGH ने धमकी देत सांगितले की, आमच्याच मुजाहिद बंधूंनी गाझीपूर, दिल्ली येथे 14 जानेवारीला झालेल्या स्फोटासाठी IED प्लांट लावला होता. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे IED प्लांटचा वेळेवर स्फोट झाला नाही, पण पुढच्या वेळी तसे होणार नाही. आम्ही आणखी तयारीसह धमाका करू, ज्याचे पडसाद संपूर्ण भारतात ऐकू येतील.”

- Advertisement -

पत्रात पुढे लिहिण्यात आहे की, “आम्ही भारतातील अनेक राज्यात आमचा तळ बनवला आहे, आम्ही भारताविरुद्ध ताकदीने लढू आणि शरियाचे राज्य स्थापन करू. या पत्रात जम्मू-काश्मीर पोलिसांनाही धमकी देण्यात आली आहे. “काश्मीर पोलिसांना वाटते की, त्यांनी आमच्या काही मुजाहिद बांधवांना पकडून आम्हाला आश्चर्यचकित केले आहे, पण त्यांना आम्ही सांगू इच्छितो की, आता तुमचे प्राण वाचवा. काश्मीर पोलीस तुम्ही तुमचे काम केले, आता आमची पाळी आहे. जर आपण अल्लाहसाठी एखाद्यावर प्रेम करू शकतो, तर त्याच्यासाठी तिरस्कारही करु शकतो.”

काश्मीर पोलिसांसोबतच दहशतवादी संघटनेने पंजाब पोलिसांनाही धमकावले असून काही शस्त्रे बाळगल्याने फार आनंद होऊ नये, असे म्हटले आहे. “पंजाब पोलिसांनी आता अल्लाहच्या सैन्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी तयारी करावी. आम्ही त्या पोलिसांची, काश्मीर पोलिसांची, लष्कर आणि काही काश्मिरी लोकांची यादी तयार केली आहे, ज्यांची नावे आमच्या मुजाहिदींना अटक केलेल्यांमध्ये सहभागी आहे. त्यांच्या कुटुंबाची यादीही तयार केली असून त्यांच्या शोध घेत त्यांच्यावर हल्ला करू. आमच्या या मेसेजचे उत्तरे तुम्हाला काही दिवसांतच दिसून येईल. कारण आमचा शब्दांवर नव्हे तर कृतीवर विश्वास आहे.”

- Advertisement -

तपासात गुंतली दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला हे पत्र मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांनी एनआयएच्या विशेष पथकाची भेट घेऊन तपास सुरू केला आहे.


प्रवासादरम्यानच शिफ्ट संपल्याने पायलटचा विमान उड्डाणास नकार, म्हणाला, माझी शिफ्ट संपली


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -