घरCORONA UPDATECorona : मौलवीचा अजब फतवा; म्हणे, कोरोना लस टोचून घेणे हराम

Corona : मौलवीचा अजब फतवा; म्हणे, कोरोना लस टोचून घेणे हराम

Subscribe

जगभरात कोरोनाने हाहाकार माजवला असून कोरोनाबाधितांचा आकडा अडीच कोटींच्या जवळ पोहोचला आहे. या विषाणूवर लस शोधण्याचा प्रयत्न जगभरातील शास्त्रज्ञ युद्धपातळीवर करत आहेत. अनेक देशांमध्ये लसीच्या चाचण्या सुरू असून लवकरच कोरोनावरील यशस्वी लस विकसित होईल, अशी आशा सर्वांना वाटत आहे. मात्र एका मौलवीने फतवा जारी करत कोरोना लस टोचून घेणे हराम, मुसलमानांची लस टोचून घेऊ नये, असे आवाहन केले आहे. एका व्हिडिओच्या माध्यमातून सुफयान खलीफा नावाच्या मौलवीने हे अजब आवाहन मुसलमानांना केले आहे.

कोरोना लस योग्य आहे असे ज्या मुसलमान संस्थांना वाटते त्यांना लाज वाटायला हवी. कोरोना लस हराम आहे, त्यामुळे मुसलमानांनी लस टोचून घेऊ नये. तसेच अन्य मुस्लिम संघटनांनी या विरोधात आवाज उठवला आहे, असे या मौलवीने व्हिडिओत म्हटले आहे. ऑस्ट्रेलियात पर्थ शहरात हा मौलवी राहत असून त्याने मुसलमानांना कोरोना लसीचा विरोध करण्यास सांगितले आहे. डेली मेलने याबाबतचे वृत्त दिले आहे. मौलवीने कोरोना लसीने समर्थन करणाऱ्या मुसलमान संघटनावर संताप व्यक्त केला आहे. कॅथलिक ख्रिश्चन कोरोना लसी विरोधात उभे राहिले आहेत, कारण ते याला हराम मानतात. हे बेकायदेशीर आहे, असे मौलवी सुफयान खलीफाने या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

Unlock 4 : केंद्र सरकारची नवीन नियमावली; २१ सप्टेंबरपासून ‘या’ गोष्टींना सशर्त परवानगी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -