घरCORONA UPDATECorona Live Update: मुंबईत १९ हजार ९७४ active कोरोना रुग्ण

Corona Live Update: मुंबईत १९ हजार ९७४ active कोरोना रुग्ण

Subscribe

मुंबई महापालिकेने गेल्या २४ तासात बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या दिली असून यामध्ये ६८२ जणांनी कोरोनावर मात केल्याचे म्हटले आहे. तर आजवर १ लाख १५ हजार ५०० जण कोरोनामुक्त झाले आहेत.

- Advertisement -

गानसम्राज्ञी लता मंगेशकर राहत असलेली प्रभुकुंज इमारत मुंबई महापालिकेकडून सील करण्यात आली आहे. या इमारतीमध्ये कोरोनाचे पाच रुग्ण आढळले असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेने ही इमारत सील केली आहे. या इमारतीमध्ये लता मंगेशकर या कुटुंबियांसोबत राहतात. मुंबईतील पेडर रोडवर ही प्रभुकुंज इमारत आहे.


राज्यात १६,८६७ नवीन रुग्णांची नोंद झाली असून कोरोना बाधित रुग्णांची संख्या ७,६४,२८१ झाली आहे. राज्यात आज रोजी एकूण १,८५,१३१ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज ३२८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या २४ हजार १०३ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ३.१५ % एवढा आहे. (सविस्तर वाचा)

- Advertisement -


केंद्र सरकारच्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार दिल्ली मेट्रो ७ सप्टेंबरपासून कॅलिब्रेटेड पद्धतीने आपल्या सेवा पुन्हा सुरू करणार असल्याचे दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या वतीने सांगण्यात आले आहे. मेट्रोच्या कामकाजाविषयी आणि सर्वसामान्यांकडून होणार्‍या वापराविषयी अधिक माहिती मेट्रोवर सविस्तर एसओपी दिल्यानंतर सेवेत आणली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.

दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन

केंद्र सरकारनेच ३० सप्टेंबरपर्यंतच्या अनलॉक ४ साठीची नवीन नियमावली जारी केली आहे. या नुसार २१ सप्टेंबरपासून सामाजिक, शैक्षणिक, खेळ, करमणूक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्ये आणि इतर मंडळांना १०० जणांच्या कमाल मर्यादेसह परवानगी देण्यात आली आहे. (सविस्तर वाचा)


अभिनेता रितेश देशमुख यांची पत्नी जिनेलिया देशमुख कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती त्यांनी स्वतः ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. तीन आठवड्यांपूर्वी तिची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर तिने २१ दिवस उपचार घेत होत्या. आता तिचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला असल्याचे तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे.


माजी खासदार नीलेश राणे कोरोनामुक्त झाले असून त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली. या काळात ज्या ज्या लोकांनी शुभेच्छा दिल्या त्यांचे नीलेश राणे यांनी आभार मानले आहेत.


युएईत दाखल झालेल्या चेन्नई सुपरकिंग्ज संघासमोरची चिंता काही केल्या कमी होत नाहीये. शुक्रवारी संध्याकाळी संघाचा प्रमुख गोलंदाज दीपक चहर आणि सपोर्ट स्टाफमधील १२ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला होता. यानंतर शनिवारी संघातला मराठमोळा खेळाडू ऋतुराज गायकवाडलाही कोरोनाची लागण झाल्याचं कळतंय. ज्या खेळाडूंचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे त्यांना तात्काळ क्वारंटाइन करण्यात आलं आहे. स्थानिक सरकारचे नियम आणि बीसीसीआच्या मार्गदर्शक तत्वांनुसार त्यांना पुढचे काही दिवस रहावं लागणार आहे.


रियाची चौकशी करणारे DCP अभिषेक त्रिमुखे पॉझिटिव्ह

सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिची चौकशी करणारे डीसीपी अभिषेक त्रिमुखे यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर त्यांच्यासह कुटुंबातील सर्व सदस्य कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. (सविस्तर वाचा)


२४ तासांत १५१ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण; ५ जणांचा मृत्यू

देशभरासह राज्यात कोरोनाचा कहर सुरू असून दिवसेंदिवस कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. बुधवारी आलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात आतापर्यंत १४ हजार ७९२ कोरोनाची लागण झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या आहे. तर कोरोना योद्धा म्हणून नागरिकांचे रक्षण करणारे महाराष्ट्र पोलीस देखील कोरोनाच्या विळख्यात सापडत असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. गेल्या २४ तासांत १५१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून सून त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तर ५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (सविस्तर वाचा)


मालिकांच्या सेटवर कोरोनाचा प्रादुर्भाव

राज्यभरात कोरोनाचा कहर सुरूच आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर केले होते. मात्र पुन्हा जनजीवन सुरळीत व्हावे यासाठी काही भागात अनलॉक केले गेले. या दरम्यान मनोरंजन विश्वात पूर्ण खबरदारी घेऊन, नियमांचे पालन करून मालिकांचे चित्रीकरण सुरू करण्यात आले. खबरदारी, काळजी घेऊन देखील मालिकांच्या सेटवर कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येते आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या टीव्ही मालिकेच्या सेटवर कोरोनाचा संसर्ग झाला असून, यात महत्त्वपूर्ण भूमिकेत असणाऱ्या मराठी अभिनेत्री स्वाती चिटणीस यांच्यासह पाच जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. (सविस्तर वृत्त)


भारतातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढताना दिसत आहे. भारतात गेल्या २४ तासांत ७६ हजार ४७२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, कोरोनामुळे १ हजार २१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर देशभरातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ३४ लाखांवर जाऊन पोहचला आहे. तर सध्या ७ लाख ५२ हजार ४२४ Active कोरोना रूग्ण असल्याची माहिती आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत देण्यात आली आहे.


राज्यात गेल्या काही दिवसांपासून रोज १४ हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची दिवसाला वाढ होत आहे. आजही १४,३६१ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७,४७,९९५ झाली आहे. राज्यात आज १,८०,७१८ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज ३३१ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या २३ हजार ७७५ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ३.१८ टक्के एवढा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -