CoronaVirus – रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांची ड्रोनद्वारे होणार आरोग्य तपासणी!

रस्त्यांवर फिरणाऱ्या लोकांचे तापमान ड्रोनद्वारे मोजल्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवणं सोप्प होणार आहे.

ड्रोन

भारतासह जगभरात कोरोनाने थैमान घातलं आहे. प्रत्येक देश कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपापल्यापरीने प्रयत्न करत आहेत. अनेक देशात लॉकडाऊन, सोशल डिस्टेन्सिंग जाहीर करण्यात आलं आहे. तर अनेक देशात ड्रोनद्वारे लोकांवर नजर ठेवली जात आहे. सौदी अरेबियानेही असाच एक वेगळा आणि भन्नाट पर्याय कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी शोधून काढला आहे. आता सौदी अरेबियात थेट ड्रोनद्वारे लोकांच्या तापमानाची तपासणी करण्यात येणार आहे.

ड्रोनद्वारे तापमान मोजणी

सौदी अरेबियामध्ये खास करून रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांच्या शरीराचे तापमान ड्रोनद्वारे मोजले जाणार आहे. आत्तापर्यंत तापमान मोजण्यासाठी थर्मल किटचा वापर करण्यात येत असे मात्र यामुळे कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनाही संसर्ग होण्याचा धोका वाढतो. याच कारणासाठी ड्रोनद्वारे लोकांच्या शरीराचे तापमान मोजण्यात येणार आहे आणि यामध्ये कोरोनाचे लक्षण आढळल्यास त्या व्यक्तींना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येणार आहे.

सौदी सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचे काम सोपं  होणार आहे. रस्त्यांवर फिरणाऱ्या लोकांचे तापमान ड्रोनद्वारे मोजल्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवता येईल. त्याचबरोबर अमेरिकेत वाघिणीला कोरोनाची बाधा झाल्याचे समजताच सौदी अरेबियामध्ये उंटांचेही तापमान तपासण्यात येणार आहे.


हे ही वाचा – चीनमध्ये नव्या कोरोनाचा धूमाकूळ