घरदेश-विदेशMake in India: गुजरातमध्ये बनलं स्वदेशी PPE किट

Make in India: गुजरातमध्ये बनलं स्वदेशी PPE किट

Subscribe

संसर्गाचा धोका नसल्याने हे किट कोरोनाच्या प्रादुर्भावापासून पुर्णतः दूर ठेऊ शकतो, त्यामुळे हे किट १०० टक्के सुरक्षित असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे

सध्या भारतात कोरोना बाधितांचा आकडा साधारण २५ हजारांवर पोहोचला आहे. या कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना कोरोना विरोधातील युद्धात लढण्यासाठी गुजरातमधील वडोदरामध्ये एका कंपनीने स्वदेशी अर्थात भारतीय बनवाटीचे पीपीई किट तयार करण्याचा पुढाकार घेतला आहे. कोरोनाशी दोन हात करताना पीपीई किटची कमतरता भासत असताना भारतात स्वदेशी PPE (personal protective equipment) किट तयार करण्याचा निर्णय या कंपनीने घेतला होता.

हे किट केंद्र सरकार, गुजरात सरकार आणि भारतीय सैन्याला उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे वडोदरा येथील कंपनी शोर सेफ्टी (इंडिया) लिमिटेड कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी सांगितले.

- Advertisement -

असे आहे पीपीई किट

मिळालेल्या माहितीनुसार, या किटमधील सूट पॉझिटिव्ह एअर प्रेशरनं चालवला जातो. सूटमधील हवेच्या गुणवत्तेचं मूल्यमापन ऑनलाईन पद्धतीने केले जात असून हे पीपीई सूट डिस्पोजेबल नाही. त्यामुळे संसर्गाचा धोका नसल्याने हे किट कोरोनाच्या प्रादुर्भावापासून पुर्णतः दूर ठेऊ शकतो, त्यामुळे हे किट १०० टक्के सुरक्षित असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

- Advertisement -

दरम्यान कोरोनामुळे संपूर्ण जगात भीतीचे वातावरण पसरले आहे. जगभरातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा २६ लाखांहून अधिक आहे. तर कोरोनामुळे १ लाख ८३ हजारहून अधिक जणांचा बळी गेला आहे. सर्वाधित कोरोनाचे रुग्ण आढळलेल्या अमेरिकेत गेल्या २४ तासांत २ हजार ४९४ जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे अमेरिकेतील मृतांचा आकडा ५३ हजार ५११वर पोहोचला आहे. तसंच ९ लाख ३६ हजार २९३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.


CoronaVirus: जगात कोरोनाचा हाहाकार: दोन लाखांहून अधिक जणांचा बळी!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -