घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटCoronaVirus: जगात कोरोनाचा हाहाकार: दोन लाखांहून अधिक जणांचा बळी!

CoronaVirus: जगात कोरोनाचा हाहाकार: दोन लाखांहून अधिक जणांचा बळी!

Subscribe

आतापर्यंत जगभरात कोरोनाग्रस्तांची संख्या २९ लाखांहून अधिक झाली आहे. त्यापैकी ८ लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातल आहे. जगभरात कोरोना व्हायरसमुळे २ लाखांहून अधिक जण मृत्यूमुखी पडले आहेत. सर्वाधिक कोरोनामुळे अमेरिकेतील लोक मरण पावले आहेत. अमेरिकेत गेल्या २४ तासांत २ हजार ४९४ जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे अमेरिकेतील मृतांचा आकडा ५३ हजार ५११वर पोहोचला आहे. तसंच ९ लाख ३६ हजार २९३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे, अशी माहिती जॉन्स हॉपकिन्स विद्यापिठाने दिली आहे.

आतापर्यंत जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या २९ लाख २३ हजार १०९वर पोहोचली आहे. त्यापैकी २ लाख ३ हजार ३०७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ८ लाख ३७ हजार ३२३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात अमेरिकेत पाठोपाठ स्पेन, इटली, फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन आणि तुर्की हे सर्वाधिक कोरोनाग्रस्त असून या देशांमध्ये १ ते २ लाखांहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.

- Advertisement -

अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात १७ हजारहून अधिक जण मरण पावले आहेत. त्यामुळे अमेरिकेतील मृतांचा आकडा ५३ हजार पार आहे. अमेरिके पाठोपाठ इटलीमध्ये देखील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. इटलीमध्ये २६ हजार ३८४ जण मृत्यूमुखी पडले आहेत. तर स्पेनमध्ये २२ हजार ९०२ आणि फ्रान्समध्ये २२ हजार ६१४ आणि ब्रिटनमध्ये २० हजार ३१९ जण कोरोनामुळे मरण पावले आहेत. त्यामुळे जगातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसत आहे.


हेही वाचा – CoronaVirus: मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा पाच हजारवर!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -