घरदेश-विदेशLockDown: बापरे! घरी जाण्यासाठी ३ लाख खर्च करून बनला कांद्याचा व्यापारी!

LockDown: बापरे! घरी जाण्यासाठी ३ लाख खर्च करून बनला कांद्याचा व्यापारी!

Subscribe

मुंबईहून अलाहाबादला आपल्या घरी जाण्यासाठी तब्बल लाख रुपये खर्च केले

कोरोना व्हायरस संसर्ग रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. परंतु या लॉकडाऊनमध्ये असेही काही लोकं आहेत जे आपल्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी कोणत्याही पद्धतीचा अवलंब करताना दिसताय. एक प्रकार उत्तरप्रदेशातून समोर आला आहे, यामध्ये एक व्यक्तीने मुंबईहून अलाहाबादला आपल्या घरी जाण्यासाठी तब्बल लाख रुपये खर्च करण्यास मागे पुढे बघितले नाही.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, अलाहाबाद येथील रहिवासी असलेला प्रेम मूर्ती पांडे हा मुंबई विमानतळावर काम करत असून तो मुंबईच्या अंधेरी पूर्व भागातील आझाद नगरमध्ये राहण्यास होता. त्यांनी सांगितले की, आझाद नगर हे मुंबईचे खूप गर्दीचे ठिकाण आहे, याठिकाणी सर्वाधिक लोकसंख्या असल्याने कोरोनाव्हायरस पसरण्याचा धोका अधिक होता.

- Advertisement -

असा घडला प्रकार

प्रेम मूर्ती पांडे या व्यक्तीने असे सांगितले की, पहिल्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये मी २१ दिवस कसे-बसे काढले. त्यानंतर सर्व सुरळीत होईल अशी आशा होती. मात्र तसे न होता लॉकडाऊनची मर्यादा अधिक वाढवण्यात आली. यावेळी माझ्या मनात एक कल्पना आली की, हिरव्या भाज्या, जीवनावश्यक खाद्यपदार्थांच्या ट्रकच्या माध्यमातूनच आपल्या घरी जाणे शक्य होईल, हे एकमेव कारण असू शकते त्याचा आधार घेऊन मला एका राज्यातून दुसर्‍या राज्यात जाण्यास परवानगी दिली जाऊ शकते.

त्यानंतर त्याने असे ही सांगितले, ”मी ३ लाख रुपये खर्च करून आपलं घऱ गाठलं, सर्वप्रथम मी दहा हजार रुपयांचे तेराशे किलो टरबूज विकत घेऊन एका ट्रकमध्ये भरले. पिंपळगावात ४०किलोमीटर चालत कांद्याच्या बाजारात जाऊन कांद्याच्या किंमतीचा आढावा घेतला आणि २.३२ लाख रूपयांचे ९.१० रूपये प्रतिकिलोचे २५ हजार किलो चांगला कांदा खरेदी केला. यासाठी ७७ हजार ५०० रूपयांचा भाड्याने ट्रक घेतला.” जेव्हा तो मुंबईहून यूपीला पोहोचला, तेव्हा त्यांनी ट्रक थेट आपल्या गावाजवळ मुंडेरा मंडईकडे वळवला आणि हा भाजीपाला विकण्याचा प्रयत्न केला.


भारतातून २० मेपर्यंत कोरोना होणार हद्दपार; सिंगापूर युनिव्हर्सिटीचा दावा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -