घरदेश-विदेशJN.1 Variant : आठ दिवसांत भारतातील कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट

JN.1 Variant : आठ दिवसांत भारतातील कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट

Subscribe

Covid : देशात कोरोना विषाणूमुळे परिस्थिती चिंताजनक होत आहे. केरळनंतर आता आणखी दोन राज्यांमध्ये कोरोना JN.1 च्या नवीन प्रकाराची पुष्टी झाली आहे. त्यामुळे 9 दिवसांमध्ये भारतातील कोरोना रूग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. केरळनंतर महाराष्ट्र आणि गोव्यात कोरोनाच्या नविन विषाणूचे 19 रूग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रात 1 रूग्ण आढळला आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या 2 हजारांच्या जवळ पोहोचली आहे. 11 डिसेंबरलो कोरोनाचे 938 रूग्ण होते. वाढत्या कोरोना रूग्णाच्या संख्येबाबत केंद्र सरकारने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. आज केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया बैठक घेणार आहेत.

कोरोनाच्या नवीन विषाणून JN.1 सध्या अमेरिका, चीन आणि सिंगापूर या देशांमध्ये कहर करत आहे. मोठ्या प्रमाणात लोक आजारी पडत आहेत. रूग्णालयातील बेड देखील उपलब्ध नाहीत. सिंगापूरमधेय नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्यचा सल्ला दिला आहे. WHO ने या नवीन प्रकाराचे वर्गीकरण केले आहे. आणि त्याला व्हेरिएंट ऑफि इंटरेस्ट या श्रेणीमध्ये ठेवले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने मंगळवारी एका निवेदनात म्हटले आहे की, JN.1 या कोरोनाच्या विषाणू वेगाने पसरत आहे. परंतु मृत्यूची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. सावध राहण्याची गरज आहे.

- Advertisement -

नॅशनल इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) कोविड टास्क फोर्सचे सह-अध्यक्ष डॉ. राजीव जयदेवन म्हणाले की, JN.1 हे पाश्चात्य देशांमध्ये कोरोनाचे सर्वात जास्त वेगाने प्रसार झाला आहे. साधारणपणे 10 दिवसांनंतर प्रभावी होते.

“गोव्यातील JN.1 प्रकाराची 18 प्रकरणे नुकत्याच पार पडलेल्या चित्रपट महोत्सवात सहभागी झालेल्या लोकांची आहेत. महाराष्ट्रात असताना, JN.1 चे प्रकरण गोवा-महाराष्ट्र सीमेवर आढळून आले आहे. ते म्हणाले की, योग्य आता आम्हाला वाटत नाही की या क्षणी काळजी करण्यासारखे काही आहे. भारतातील कोविड प्रकरणांमध्ये वाढ इतर देशांच्या तुलनेत खूपच कमी आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -