घरताज्या घडामोडीLive Update : राज्यात २३ हजार १७९ नवे कोरोना रुग्ण

Live Update : राज्यात २३ हजार १७९ नवे कोरोना रुग्ण

Subscribe

मागील २४ तासांत राज्यात २३ हजार १७९ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून ८४ रूग्णांचा मृत्यू झाला. तसेच दिवसभरात बरे होऊन घरी परतणाऱ्यांची संख्या ९,१३८ इतकी होती.


एनआयएची दोन पथके सचिन वाझे यांच्या घरी दाखल झाले आहेत. सचिन वाझे यांनाही एनआयएने सोबत घरी आणले आहे. सोसायटीचे डीव्हिआर रिपोर्टमध्ये छेडछाड केल्याचा सचिन वाझे यांच्यावर आरोप करण्यात आला आहे.

- Advertisement -

मुंबई आयुक्त परमबीर सिंह यांच्या उचलबांगडीनंतर हेमंत नगराळे यांना मुंबईच्या आयुक्तपदी हेमंत नगराळे यांना नियुक्त करण्यात आले आहे. आताच मुंबई आयुक्त पदभार स्विकारला आहे. सध्या मुंबई पोलीस एका कठीण समस्येतून जात आहे. ही समस्या आपल्या सर्वांच्या आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या मदतीने सोडवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने माझी नियुक्ती केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या नेमनूकीच्या आदेशाप्रमाणे हा कार्यभार स्विकारला आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये जी मुंबई पोलीसांची प्रतिमा मलिन झाली आहे. त्यांना चांगले करण्याचा आणि मुंबईतील अधिकारी आणि कर्मचार्यांचा या कार्यात सहभाग लागणार आहे. सर्वांचा सहभाग लाभेल अशी माझी अपेक्षा आहे. असे मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी म्हटले आहे.


२०१८ मध्ये ज्यावेळी मी गृहमंत्री होतो त्यावेळी शिवसेनेकडून सचिन वाझेंना पुन्हा पोलीस सेवेत रुझू करण्यासाठी दबाव वाढत होता. परंतु मी वकीलांच्या शिवाय त्यांना रुझू करणार नहाी अशी भूमिका घेतली. सचिन वाझेंची फाईल पाहिली त्यात खंडणींच्या तक्रारींमुळे निलंबित केल्याचे समजले. सचिन वाझेंनीच मनसुख हिरेन यांची हत्या केली आहे. असा धक्कादायक खुलासा विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

- Advertisement -

पहिल्यादिवसापासून आमची मागणी होती. की ज्याच्या हाताखाली वाझे काम करतात त्याच्यावर कारवाई होणार यावर आमची खात्री होती. सचिन वाझेंचे प्रकरण हे उच्चतम अधिकाऱ्यांपर्यंत पोहचणार होते. मुंबई पोलीसांची गणिमा आणि प्रतिमा वाचवण्यासाठी अधिकाऱ्यांच्या बदली करण्यात आल्या आहेत. हा निर्णय योग्य असल्याचा मला वाटत आहे. असे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.


परमबीर सिंह यांची जी भूमिका सचिन वाझे यांना पुन्हा पोलीस सेवेत घेण्याबाबत होती तसेच राज्यात मागील ६ महिन्यांपासून वाझे गँगने जो हाहाकार माजवला आहे तो मुंबई पोलीसांच्या आयुक्तांच्या बदलीने थांबणार नाही आहे. असे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. परंतु परमबीर सिंह यांची आणि आणखी एक आयपीएस अधिकाऱ्याची चौकशी व्हायला हवी यासंदर्भात मागणी करण्यासाठी दिल्लीला जाणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. परमबीर सिहं यांच्या बदलीने हे प्रकरण दबून जाईल असे मुख्यमंत्र्यांना वाटत असेल परंतु आम्ही असे होऊ देणार नाही अंतिम खुलासा होईपर्यंत पाठपुरावा करु असे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.


एका सामान्य नागरिकाचा खून, एक एपीआयला अटक, त्याच्या गाडीत नोटांची बंडल, नोटा मोजण्याचे मशीन, गाडीत नंबर प्लेटचा खच…त्यावरून मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या. दुर्दैवाने ऐवढे मुंबई पोलीसांचे खच्चीकरण आणि बदनामी कधीच झाली नव्हती. ठाकरे सरकारचे हे पाप आहे! असा घणाघात भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे.


मुंबई तसेच महाराष्ट्र पोलीस दलास नवे नेतृत्व मिळाले आहे. आपल्या पोलीस दलाची परंपरा महान आहे. एकाद्या वावटळीत पोलीस दलाची पडझड होईल या भ्रमात कोणीच राहू नये. खाकी वर्दीचा मान व शान यापुढील काळात अधिक हिमतीने व सचोटीने राखला जाईल हीच अपेक्षा. अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे.


मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची उचलबांगडी केली आहे. त्यांच्या जागी पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हेमंत नगराळे यांची नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


एनआयएचे पथक सचिन वाझेंच्या साकेत येथील घरी दाखल झाले आहेत. या पथकामध्ये एकूण ८ अधिकारी सचिन वाझेंच्या घरी दाखल झाले आहेत.


राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे गेल्या तीन दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा येथे मुक्कामाला होते. प्रशासनाकडून हा त्यांचा खाजगी दौरा असल्याचे सांगण्यात आले. ते घोसरी येथील एका खाजगी मालकीच्या रिसॉर्टवर थांबले होते. आज सकाळी पण त्यांनी ताडोबाची सफारी केली आणि दुपारी १.५० ला मुंबईकडे रवाना झाले.


साताऱ्यातील नरवणे येथे वाळूच्या ठेक्यावरून दोन गटात तलवारीने मारामारी झाली. दोघांचा जागीच मृत्यू तर पाच जण जखमी झाले आहेत. नरवणे गावातील वाळूचा लिलाव घेतल्याचा कारणातून तलवारीने हल्ला करण्यात आला. चंद्रकांत जाधव आणि विलास जाधव या दोन सख्ख्या चुलत भावांचा जागीच मृत्यू झाला.


महेश मोतेवार याने दगडूशेठ’ हलवाई गणपतीला दान केलेले सोन्याचे दीड किलोचे दागिने राज्य गुन्हे अन्वेषन विभागाने (सीआयडी) ताब्यात घेतले आहेत.


देशात गेल्या २४ तासांत २८ हजार ९०३ नवे रुग्ण सापडले. १७ हजार ७४१ रुग्ण बरे झाले तर १८८ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात १ कोटी १४ लाख ३८ हजार ७३४ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यात १ कोटी १० लाख ४५ हजार २८४ जण बरे झाले आहेत. देशात २ लाख ३४ हजार ४०६ सक्रिय रुग्ण आहेत. आता पर्यंत १ कोटी ५० लाख ६४ हजार ५३६ जणांना लस देण्यात आली आहे.


‘सह्याद्री’वर महाविकास आघाडी समन्वय समितीची बैठक सुरु झाली आहे. बैठकीसाठी बाळासाहेब थोरात, अजित पवार, जयंत पाटील, अशोक चव्हाण, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे सह्याद्रीवर पोहोचले.  मंत्र्यांच्या खात्यातील विषयांवर चर्चा होणार


सचिन वाझे प्रकरणावर राज्य मंत्रिमंडळात काहीही घडामोडी घडत नाहीयेत. सचिन वाझे प्रकरणामुळे सरकार अस्थिर झालं यात तथ्य नाही, पुढील साडेतीन वर्ष सरकार पडणे शक्य नाही, असं संजय राऊत यांनी सांगितलं.


हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातली भाजपचे खासदार रामस्वरुप शर्मा यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. दिल्लीतल्या खासदार निवासस्थानात त्यांनी आत्महत्या केली आहे. गोमती या खासदार निवासस्थानी पहाटे आत्महत्या केली.


खाद्य तेलांचे भाव वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचा तुटवडा असल्यानं भाव वाढले आहेत. वर्षभरात खाद्यतेलाच्या १५ किलोच्या डब्यामागे १ हजार रुपयांची वाढ झाली आहे.


देशात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ व्हायला सुरु झाली आहे. या कोरोनाच्या स्थितीवरुन आता मोदी अॅक्शन मोड मध्ये आले आहेत. आज सकाळी ११ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. देशातील कोरोनाची स्थिती आणि लसीकरणाची स्थिती या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा करणार आहेत.


माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांचे कोरोनामुळे आज पहाटे निधन झाले. काल दिलीप गांधी यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता. त्यानंतर दिल्ली येथील खाजगी रुग्णालयात सुरू उपचार होते.


नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा स्फोट झाला आहे. सहा दिवसात पाचव्यांदा कोरोना बाधितांची संख्या हजारांच्या पार गेली आहे. काल दिवसभरात १३५४ नवीन रुग्ण सापडले असून ८ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे आता कोरोना संदर्भातील निर्बंध आणखी कठोर होण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -