घरदेश-विदेशWest Bengal Elections 2021: ममता बॅनर्जींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं सनसनीत उत्तर

West Bengal Elections 2021: ममता बॅनर्जींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं सनसनीत उत्तर

Subscribe

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. उप निवडणूक आयुक्त सुदीप जैन यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सांगितले की, कोणत्याही नियमांचे उल्लंघन झाले नाही. ममता बॅनर्जी यांना दिलेल्या कडक शब्दात निवडणूक आयोगाने मंगळवारी लिहिलेल्या या पत्रात असे म्हटले की, राजकीय पक्षाच्या जवळीक असलेले आरोप आयोग खपवून घेणार नाही. यासंदर्भात आयोगाकडून नाराजी देखील व्यक्त केली जात आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांना पाठविलेल्या ममतांच्या पत्राला उत्तर देताना निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, ‘कोलकाता आणि राष्ट्रीय राजधानीत अलीकडच्या काळात टीएमसीच्या प्रतिनिधींची भेट घेतल्यानंतरही, मुख्यमंत्र्यांनी असे सांगितले की जर आयोगाने राजकीय पक्षांची भेट घेतली तर संस्था म्हणून आयोगाचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल.’

तसेच, निवडणूक आयोग कोणत्या पक्षासाठी काम करतंय, असा आरोप ममता बॅनर्जी वारंवार निवडणूक आयोगावर करत आहे. मंगळवारी त्यांनी एका सभेत सांगितले की, जर भाजपाने निवडणूक आयोगाच्या कामकाजात हस्तक्षेप करणे थांबवले नाही तर आयोगाच्या बाहेर आंदोलन करण्यात येईल. दरम्यान, पूर्व मेदिनीपूर येथील नंदीग्राममध्ये गेल्या आठवड्यात बॅनर्जी जखमी झाल्यानंतर निवडणूक आयोगाने त्यांच्या सुरक्षा संचालक विवेक सहाय यांना काढून टाकले होते. या कारणामुळे भाजपा त्यांच्या हत्येचा कट रचत आहे, असेही बॅनर्जी यांनी बांकुरा येथील मेजिया येथे निवडणूकीच्या जाहीर सभेत सांगितले होते.

- Advertisement -

नंदिग्राममधील झालेल्या या घटनेत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना गंभीर दुखापत झाली होती. यानंतर निवडणूक आयोगाने सुरक्षा संचालक विवेक सहाय आणि मेदिनीपूरचे माजी पोलिस अधीक्षक प्रवीण प्रकाश यांना १४ मार्च रोजी निलंबित केले होते. दरम्यान १० मार्च रोजी ममता बॅनर्जी यांच्यावर हा कथित हल्ला झाला होता. परंतु निवडणूक आयोगाने हा हल्ला नाकारला होता.

असा केला होता आयोगावर आरोप

नंदिग्राममध्ये उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रचारासाठी गेलल्या ममता बॅनर्जींवर हल्ला करण्यात आल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. या घटनेमागे भाजपाचा हात असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसच्या काही नेत्यांनी केला होता. तृणमूल काँग्रेसच्या एका शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाची भेट घेतली होती. या भेटीनंतर नेत्यांनी आयोगाच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले. यावेळी ममता बॅनर्जींना निवडणूक आयोगाने योग्य सेवा पुरवली नाही. यासह निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर देखील राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या सध्यस्थितीला निवडणूक आरोपच जबाबदार असून निवडणूक अधिकारी आपली जबाबदारी झटकत आहेत. तर निवडणूक आयोग भाजपाच्या इशाऱ्यावर आपले कामकाज करते असा आरोप देखील तृणमूल काँग्रेसकडून करण्यात आला होता.


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -