घरदेश-विदेशदिलासा! भारतातील Corona चाचण्या अंतिम टप्प्यात; डिसेंबपर्यंत येणार लस!

दिलासा! भारतातील Corona चाचण्या अंतिम टप्प्यात; डिसेंबपर्यंत येणार लस!

Subscribe

कोविशिल्ड, कोव्होव्हॅक्स, कोव्हीव्हॅक्स, कोव्ही-व्हॅक, एसआयआय-कोव्हॅक्स या पाच कोव्हिड लस दर तीन महिन्यांना एक याप्रमाणे २०२१ या वर्षात बाजारात येणार

कोरोनाचे संकट देशासह जगभरात अद्याप कायम आहे. अशा परिस्थितात कोरोनावरील लस कधी येणार याकडेच साऱ्यांचे लक्ष आहे. दरम्यान कोरोना लसीसंदर्भात एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. पुण्यातील ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’चे प्रमुख अदर पूनावाला यांनी ‘कोविशिल्ड’ लस डिसेंबपर्यंत तयार होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला आहे. तर ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या ‘कोविशिल्ड’ या लसच्या भारतातील चाचण्या अंतिम टप्प्यात असल्याची माहिती मिळतेय.

त्यामुळे या लसीचे १० कोटी डोस नवीन वर्षांच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या तिमाहीत उपलब्ध होतील. तसेच डिसेंबपर्यंत कोरोना लसीच्या चाचण्या पूर्ण होऊ होण्यार असल्याची शक्यता असून जानेवारीत ही लस भारतात उपलब्ध होऊ शकेल. मात्र या लसीची उपलब्धता ब्रिटनमधील चाचण्या पूर्ण होण्यावर अवलंबून असल्याचे ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’चे प्रमुख अदर पूनावाला यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाशी सीरम इन्स्टिटय़ूटने लसच्या उत्पादनासाठी करार केला आहे. लसच्या सुरक्षिततेबाबत आता खात्री झाली आहे. या लसने कोव्हिड- १९ विषाणू विरोधात चांगली प्रतिकारशक्ती तयार होते, स्पष्ट झाले आहे. मात्र अद्याप या लसीची किंमत किती असणार हे आता सांगता येणार नाही.

पाच कोव्हिड लस २०२१ या वर्षात बाजारात येणार

तसेच ब्रिटनमधील चाचण्या पूर्ण होण्यावर या लसबाबत अधिकृतपणे जाहीर होईल. त्यानंतर या लसचे १० कोटी डोस नवीन वर्षांच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या तिमाहीत उपलब्ध करण्यात येतील. त्यामुळे डिसेंबपर्यंत आमच्या चाचण्या पूर्ण होऊ शकतील. जानेवारीत ही लस भारतात उपलब्ध होऊ शकेल, असे पूनावाला यांनी स्पष्ट केले आहे. यासह लसचा काही खर्च सरकार उचलण्याची शक्यता असल्याने लस फार महाग असणार नाही, असे त्यांनी सांगितले. कोविशिल्ड, कोव्होव्हॅक्स, कोव्हीव्हॅक्स, कोव्ही-व्हॅक, एसआयआय-कोव्हॅक्स या पाच कोव्हिड लस दर तीन महिन्यांना एक याप्रमाणे २०२१ या वर्षात बाजारात आणणार आहोत, असेही ते म्हणाले.


Corona Vaccine : देशातील प्रत्येक नागरिकाला मिळणार कोरोना लस; PM मोदींचा दावा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -