घरदेश-विदेशगोहत्या बंदी कायद्याचा होतोय दुरुपयोग; वाचा काय आहे प्रकरण

गोहत्या बंदी कायद्याचा होतोय दुरुपयोग; वाचा काय आहे प्रकरण

Subscribe

गोहत्या बंदी कायद्याचा अलाहाबाद येथे एका प्रकरणात दुरूपयोग करण्यात आला असल्याची माहिती समोर आलेली आहे. या कायद्याच्या अंतर्गत अटक करण्यात आलेल्या व्यक्तीला अलाहाबाद न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आलेला आहे.

देशातील अनेक राज्यात गोहत्या बंदी कायदा लागू करण्यात आलेला आहे. उत्तर भारतातील अलहाबाद येथे देखील हा कायदा लागू आहे. पण या गोहत्या बंदी कायद्याचा अलाहाबाद येथे एका प्रकरणात दुरूपयोग करण्यात आला असल्याची माहिती समोर आलेली आहे. या कायद्याच्या अंतर्गत अटक करण्यात आलेल्या व्यक्तीला अलाहाबाद न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. जुगाडी निजामुद्दीन असे जामीन करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जामीन मंजूर करण्यात आलेल्या आरोपीला ज्या ठिकाणाहून अटक करण्यात आले, त्या ठिकाणाहून अधिकाऱ्यांना कोणतेही गोमांस सापडले नाही. तर त्याठिकाणी अधिकाऱ्यांना एक दोरी आणि काही प्रमाणात गायीचे शेण आढळले. ज्यामुळे कोर्टाने अधिकाऱ्यांकडून हलगर्जीपणे करण्यात आलेल्या कामावर ताशेरे ओढले आहेत.

- Advertisement -

या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायालयाने सांगितले की, काही लोकांनी साक्ष दिली होती की त्यांनी आरोपीला एका गायीच्या वासरासोबत जमीलच्या शेतात जाताना पाहिले होते. खेडेगावात वास्तव्य करणाऱ्या कुठल्याही जातीच्या किंवा धर्माच्या माणसाकडे गाय आणि वासरू असणं ही अतिशय सामान्य बाब आहे. सगळ्याच धर्माचे, समुदायचे लोक गाय, बैल पाळतात. तसेच आता या प्रकरणाची पारदर्शक पद्धतीने चौकशी झाली पाहिजे. कारण या प्रकरणात तशा प्रकारचा तपास झालेला दिसत नाही. या प्रकरणात आता उत्तर प्रदेशचे डीजीपी यांना पुढील तपास करण्याचे आदेश देखील कोर्टाकडून देण्यात आले आहेत. तर गोहत्येशी संबंधित तपास करत असताना अधिकाऱ्यांनी आपली कर्तव्य विसरू नये, असे ताशेरे कोर्टाकडून ओढण्यात आले आहेत.

फॉरेन्सिक लॅब हे गायीच्या शेणाचं विश्लेषण करण्यासाठी नाही
दरम्यान, या प्रकरणी जेव्हा कारवाई करण्यात आली तेव्हा अधिकाऱ्यांना घटनास्थळावरून कोणतेही गोमांस सापडले नाही. पण अधिकाऱ्यांना गायीचे शेण आणि दोरी आढळून आली. हे शेण जेव्हा फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आले तेव्हा फॉरेन्सिक लॅब हे गायीच्या शेणाचं विश्लेषण करण्यासाठी नाही, असा अहवाल लखनऊच्या लॅबकडून देण्यात आलेला आहे. तसेच केवळ शंका आणि संशय यांच्या आधारावर FIR दाखल करण्यात आल्याची माहिती खंडपीठाकडून देण्यात आली आहे. फक्त संशय होता म्हणून आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. आरोपीची कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. त्यामुळे त्याला जामीन मंजूर करण्यात आलेला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मुंबईच्या एनएमआयएमएस विद्यापीठात विद्यार्थ्यांना इंटरनेट वापरण्यास बंदी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -