घरक्रीडाIPL 2023 : आयपीएलवर कोरोनाचे सावट?; समालोचक आकाश चोप्रा कोरोना पॉझिटीव्ह

IPL 2023 : आयपीएलवर कोरोनाचे सावट?; समालोचक आकाश चोप्रा कोरोना पॉझिटीव्ह

Subscribe

मुंबई : भारताचा माजी खेळाडू आणि दिग्गज समालोचक आकाश चोप्रा (Aakash Chopra) यांना कोरोना (Corona) झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे नुकत्याच सुरु झालेल्या आयपीएल 2023 वर कोरोनाचे सावट पसरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हेही वाचा – धोनीची कर्णधारपद सोडण्याची धमकी! वाइड बॉल फेकणे थांबवा नाहीतर…

- Advertisement -

आकाश चोप्रा यांनी स्वतः ट्विट करत कोरोना झाल्याची माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटरमध्ये सांगितले की, कोरोनाने पुन्हा माझ्यावर हल्ला केला असून सध्या सौम्य लक्षणे जाणवत आहेत. त्यामुळे पुढील काही दिवस मी समालोचन करताना दिसणार नाही. कोरोनामुळे घसा खराब होऊन आवजावर परिणाम होऊ शकतो, असेही आकाश यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

- Advertisement -

आकाश चोप्रा आयपीएल 2023 मध्ये जिओ सिनेमासाठी हिंदीमध्ये समालोचन करतात. त्यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलच्या कम्युनिटी पोस्टमध्ये कोविडने माझ्यावर पुन्हा एकादा हल्ला केला आहे. त्यामुळे व्यत्ययाबद्दल क्षमस्व, असे लिहिले आहे. क्रिकेट हिंदी समालोचन क्षेत्रात आकाश चोप्रा लोकप्रिय आहेत. त्याच्या चांगल्या समालोचनामुळे त्यांनी क्रिकेट रसिकांना वेड लावले आहे. आयपीएल 2023 ला नुकतीच 31 मार्चपासून सुरूवात झाली असून लीग स्टेजमधील सामने 21 मे पर्यंत चालणार आहेत. त्यानंतर पहिले 4 संघ प्लेऑफचे सामने खेळतील आणि 28 मे रोजी अंतिम सामना खेळवला जाणार आहे.

भारतासाठी टेस्ट क्रिकेट खेळले 
आकाश चोप्रा यांनी ऑक्टोबर 2003 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि एक वर्ष खेळताना त्यांनी ऑक्टोबर 2004 मध्ये आंतरराष्ट्रीय निवृत्ती जाहीर केली. एक वर्षाच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत आकाश चोप्रा यांनी 10 कसोटी सामने खेळताना 23 च्या सरासरीने 437 धावा केल्या आहेत. यामध्ये 60 धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी असून त्यांनी 2 अर्धशतके झळकावली आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -