घरदेश-विदेशJammu & Kashmir: दहशतवाद्यांशी लढताना महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण

Jammu & Kashmir: दहशतवाद्यांशी लढताना महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण

Subscribe

या सुपूत्राचे नाव नरेश बडोले असून ते नागपूर येथे राहणारे आहेत.

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत गुरुवारी एक अतिरेकी ठार झाला. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, जिल्ह्यातील त्राल भागातील मगहमा येथे सुरक्षा दलाला घेराव घालून शोध मोहीम चालू असताना ही चकमक झाली. त्याचवेळी बडगाम जिल्ह्यात सीआरपीएफ दलावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एक जवान शहीद झाला आहे. जम्मू-कश्मीरमधील बडगाव जिल्ह्यात आज झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचा एक जवान गंभीर जखमी झाल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. नरेश उमराव बडोले असे त्या जवानाचे नाव आहे. आज दहशतवादी हल्ल्यात शत्रूशी लढताना नरेश बडोले यांना वीरमरण आले आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-कश्मीरमधील बडगाव जिल्ह्यात आज झालेल्या दहशतवादी हल्ला झाला. दहशतवादी त्यांची सर्विस रायफल देखील आपल्यासोबत घेऊन गेले होते. पोलिसांच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, दहशतवाद्यांनी बडगाम जिल्ह्यातील कॅसरमुल्लामध्ये CRPF च्या ११७ व्या बटालीयनमधील एका जवानावर गोळी झाडली. त्यांनी पुढे सांगितले की, दहशतवादी त्यांची सर्विस रायफल सोबत घेऊन गेले. जवानाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

तसेच हा भाग सील करण्यात आला असून दहशतवाद्यांचा तपास सुरू आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील एका सुपूत्राला दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आले आहे. या सुपूत्राचे नाव नरेश बडोले असून ते नागपूर येथे राहणारे आहेत. त्यांना वीरमरण आल्यानंतर कुटुंबीयांवर मोठी शोककळा पसरली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -