घरमुंबईआधी आंदोलनाचा इशारा, आता राज ठाकरेंची भेट; डबेवाले संघर्षाच्या पवित्र्यात

आधी आंदोलनाचा इशारा, आता राज ठाकरेंची भेट; डबेवाले संघर्षाच्या पवित्र्यात

Subscribe

मुंबई डबेवाले असोसिएशनने आज, गुरूवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी कृष्णकुंजवर भेट घेतली. या भेटीदरम्यान डबेवाल्यांनी मुंबईतील लोकल रेल्वेने प्रवास करण्यास परवानगी मिळावी, अशी प्रमुख मागणी केली. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर तसेच इतर सदस्य उपस्थित होते.

मुंबई डबेवाले असोसिएशनने घेतली राज ठाकरे यांची भेट | Mumbai Dabbawala Association meets Raj Thackeray

मुंबई डबेवाले असोसिएशनने आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी कृष्णकुंजवर भेट घेतली. या भेटीदरम्यान डबेवाल्यांनी मुंबईतील लोकल रेल्वेने प्रवास करण्यास परवानगी मिळावी, अशी प्रमुख मागणी केली. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर तसेच इतर सदस्य उपस्थित होते.

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Wednesday, September 23, 2020

- Advertisement -

मुंबई डबेवाला असोशिएशनचे सुभाष तळेकर यांच्या नेतृत्वाखाली डबेवाल्यांच्या शिष्टमंडळाने राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांना डबेवाल्यांनी मागण्यांचे निवेदन दिले आहे. दोन दिवसांपूर्वी मनसेने लोकल सेवा सुरू करण्यासाठी सविनय कायदेभंग आंदोलन केले होते. त्यामुळे सरकारने हा इशारा समजून लोकल सेवा पूर्ववत करावी. आमचं पोट या लोकल सेवेवर अवलंबून आहे. त्यामुळे आता लोकल सुरू न झाल्यास मनसेने वात पेटवली आहे. त्याचा भडका होऊ शकतो. आम्हालाही या आंदोलनात सहभागी व्हावे लागेल, असा इशारा मुंबईतील डबेवाल्यांनी दिला होता. त्यानंतर त्यांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतली.

- Advertisement -

राज्यात कोरोना या आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता डबेवाल्यांनी १९ मार्चपासून डबे पोहोचवण्याचा व्यवसाय बंद केला होता. त्यानंतर लॉकडाऊन झाल्याने गेल्या जवळपास साडेपाच महिन्यांपासून डबेवाल्यांना रोजगार मिळालेला नाही. त्यामुळे डबेवाल्यांची आर्थिक स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. त्यामुळे मुंबईतील लोकलसेवा लवकरात लवकर सुरु करा, अन्यथा डबेवाल्यांना दर महिना किमान ३ हजार रुपये अनुदान द्या, अशी मागणी डबेवाल्यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

हेही वाचा –

वसतिगृहाअभावी आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थी शिक्षणापासून वंचित

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -