घरदेश-विदेशडीपफेक हा भारताला भेडसावत असलेला सर्वात मोठा धोका; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली...

डीपफेक हा भारताला भेडसावत असलेला सर्वात मोठा धोका; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली चिंता

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी (17 नोव्हेंबर) भाजपाच्या दिल्लीतील मुख्यालयात दिवाळी मिलन कार्यक्रमात बोलत होते.

नवी दिल्ली : अगदी काहीच दिवसापूर्वीच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री असलेल्या रश्मिका मंदाना हिचा फेक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या प्रकाराला डीपफेक व्हिडीओ असे म्हटल्या गेले. त्यानंतर हिंदी सिनेसृष्टीतील कटरिना कैफसुद्धा याची बळी ठरली होती. या सगळ्या प्रकरणाची देशपातळीवर दखल घेण्यात आली आहे. मात्र, आज स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याप्रकरणी भाष्य करत चिंता व्यक्त केली आहे. (Deepfake is the biggest threat India faces Prime Minister Modi expressed concern)

पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी (17 नोव्हेंबर) भाजपाच्या दिल्लीतील मुख्यालयात दिवाळी मिलन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी डीपफेक व्हिडीओबाबत ते म्हणाले की, मीसुद्धा काही वेळा गाणे गाताना दिसून आलो, एकूणच डीपफेक हा प्रकार सध्याच्या अत्याधुनिक युगासाठी धोकादायक असाच प्रकार आहे. यासाठी नागरिकांनी स्वतःच प्रचार आणि प्रसार करून जागरूक राहण्याची गरज आहे.

- Advertisement -

मी आयुष्यात कधी गरबा खेळलो नाही

याच कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मी लहानपणापूसन गरबा खेळलेलो नाही. परंतू तरीही माझा गरबा खेळतानाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये पंतप्रधानांसारखा दिसणारा एक व्यक्ती काही महिलांसोबत गरबा नृत्य करताना दिसत आहे. फॅक्ट चेकनुसार, असे आढळून आले आहे की, व्हिडिओमध्ये डीपफेकचा वापर झालेला नसून ती व्यक्ती प्रत्यक्षात पंतप्रधानांसारखीच दिसणारी असून त्यांचं नाव विकास महंते आहे. ते एक अभिनेते आहेत.

हेही वाचा : आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर पुन्हा हल्लाबोल; राज्यपालांकडे पत्र लिहून केली कारवाईची मागणी

- Advertisement -

डीपफेकचा व्हिडीओ बनवणे आणि व्हायरल करणे गुन्हा

मागील काही दिवसांपासून डीपफेक व्हिडीओ बनवणे आणि व्हायरल करण्याचे प्रमाण वाढले आहे. हा प्रकार आता दिग्गज अभिनेत्रींसोबतही होत असल्याचे दिसून येत असल्याने डीपफेक तयार करणे आणि पसरवणे यासाठी शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. डीपफेक तयार करून व्हायरल केल्यास एक लाख रुपये दंड आणि तीन वर्षांची शिक्षा होऊ शकते, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा : छगन भुजबळांनी मनोज जरांगेंवर केलेल्या टीकेवर प्रकाश आंबेडकर म्हणाले; “राजकीय…”

काय आहे डीपफेक व्हिडीओ?

आजच्या डिजिटल युगात इंटरनेटच्या मदतीने अनेक वेळा चुकीच्या बातम्या आणि दिशाभूल करणारी माहिती लोकांपर्यंत पोहोचवली जात आहे. तत्सम व्हिडीओ देखील प्रसारीत केले जातात. याला डीपफेक म्हणतात. यामध्ये खरी आणि बनावट ओळखणे खूप अवघड आहे. यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजी (एआय) आणि मशीन लर्निंग सॉफ्टवेअरचा वापर करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -