घरमहाराष्ट्रछगन भुजबळांनी मनोज जरांगेंवर केलेल्या टीकेवर प्रकाश आंबेडकर म्हणाले; "राजकीय..."

छगन भुजबळांनी मनोज जरांगेंवर केलेल्या टीकेवर प्रकाश आंबेडकर म्हणाले; “राजकीय…”

Subscribe

अकोला : राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी जालन्यातील ओबीसी मेळाव्यातून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे. आजच्या अंबडच्या सभेत छगन भुजबळांनी मनोज जरांगे पाटील यांना राजकीय आव्हान देण्याची गरज काय होती ?, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. आकोल्यातील जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथे आज प्रकाश आंबेडकरांच्या वतीने ओबीसी संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती.

प्रकाश आंबेडकरांनी छगन भुजबळांच्या अंबडमधील ओबीसी एल्गार सभेवर टीका केली आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले, “राज्यात आरक्षणाच्या मुद्यावरून दोन समाजात दंगली घडवण्याचा काहीचा प्रयत्न आहे. पण राज्यात दंगली होऊ नये म्हणून जिल्ह्याजिल्ह्यात बैठका घेऊन. अंबडच्या आजच्या सभेत छनग भुजबळांना मनोज जरांगे पाटील यांना राजकीय आव्हान देण्याची गरज काय होती? आरक्षणावर भांडू काही साध्य होणार आहे का? सर्वांना राज्यात एकत्र राहायचे आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न हा कायद्याच्या चौकटीत राहून सुटू शकतो.”

- Advertisement -

हेही वाचा – छगन भुजबळांच्या टीकेला मनोज जरांगेंचे प्रत्युत्तर, म्हणाले – “धमक्या देऊ नका.”

भुजबळांनी जरांगेंवर टीका करताना म्हणाले…

अंबडमधील ओबीसी एल्गार सभे छगन भुजबळांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करताना म्हणाले, “काही लोक म्हणतात की मी दोन वर्ष तुरुंगात बेसन भाकर खाल्ली. त्यांना मी सांगतोय की होय मी खाल्ली, अगदी दिवाळीतही मी बेसन भाकर ठेचा कांदा खाल्ला पण तुमच्या सारखा सासऱ्याच्या घरी भाकरीचे तुकडे मोडत नाही अशी जहरी टीका त्यांनी केली. ते म्हणाले की, यांना कायद्याची काही माहिती नाही केवळ सकाळी उठायचे आणि काहीही बोलायचे असा प्रकार आहे. त्यामुळे मराठा तरुणांनी या शेंदूर लावलेल्या दगडाच्या मागे फिरू नये. हा महाराष्ट्र सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारा महाराष्ट्र आहे. त्यासाठी अनेक नेत्यांनी योगदान दिल मात्र काही लोक जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे,” अशी टीका छगन भुजबळांनी केली.

- Advertisement -

हेही वाचा – मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी संकल्पबद्ध तर OBC ना…; फडणवीसांचे सूचक वक्तव्य

छगन भुजबळ पुढे म्हणाले की, आरक्षण काही गरीब हटावचा कार्यक्रम नाही. मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. मराठा आरक्षणासाठी राज्यात ५८ मोर्चे निघाले आम्ही विरोध केला नाही. ओबीसींना धक्का न लावता आरक्षण देण्यात याव यासाठी आपण सर्वप्रथम पाठींबा दिला. मात्र आम्ही कुणाची घर जाळली नाही आज काही आमदार कार्यकर्त्यांनी तर विरोधात भुमिका घेतलीच नाही तरी त्यांची घरे जाळली. कायद्याने आरक्षणाला आमचा विरोध नाही. मागच्या दाराने घुसण्याचा प्रयत्न करू नये अशी टीका त्यांनी केली.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -