घरदेश-विदेशसिख फॉर जस्टिस संघटनेकडून संसदेला घेराव घालत खलिस्तानी झेंडा फडकवण्याचा कट, दिल्लीत...

सिख फॉर जस्टिस संघटनेकडून संसदेला घेराव घालत खलिस्तानी झेंडा फडकवण्याचा कट, दिल्लीत हायअलर्ट जारी

Subscribe

केंद्रीय संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु झाले आहे. या अधिवेशनात आज तीन कृषी कायदे मागे घेण्याचे विधेयक संमत करण्यात आले. दरम्यान हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील सुरक्षा यंत्रणांनी हाय अलर्ट जारी केला आहे. अशातच सिख फॉर जस्टीस संघटनेने संसदेला घेराव घालत खलिस्तानी झेंडा फडकवण्याचा कट आखला होता. संघटनेने एक व्हिडिओच्या माध्यमातूनही अशी धमकी दिली आहे. या व्हिडिओनंतर आत्ता दिल्लीत गुप्तचर यंत्रणांकडून अलर्ट जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये सिख फॉर जस्टिस संघटनेने शेतकऱ्यांना संसदेला घेराव घालत खलिस्तानी झेंडा फडकवण्याचे आवाहन केले होते. यामुळे दिल्लीत पुन्हा कोणता अनुचित प्रकार घडू नये यासाठी दिल्ली पोलिसांसह इतर गुप्तचर यंत्रणांकडून सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे,.

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील प्रत्येक भागांत सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. दिल्ली-एनसीआर सीमेवर आंदोलन करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चातील आंदोलक शेतकऱ्यांनी २९ मार्चचा ट्रॅक्टर मार्च स्थगित केला. यानंतर दिल्ली पोलिसांकडून ठिकठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात केले आहे.

- Advertisement -

२६ जानेवारी २०२० रोजी दिल्लीत झालेल्या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मार्चदरम्यान लाल किल्ल्यावर हिंसक घटना घडली होती. यावेळी लाल किल्ल्यावरील देशाचा तिरंग हटवून अन्य झेंडा फडकवण्याचा प्रयत्न झाला होता. यात मोठी हिंसाचाराची घटना घडली. याच पार्श्वभूमीवर आत्ता संसद भवन, नॉर्थ ब्लॉक, साऊथ ब्लॉक, राष्ट्रपती भवन, पंतप्रधान निवा, गृहमंत्री निवास, इंडिया गेट, जंतर-मंतर, प्रमुख बाजारपेठा, रेल्वे स्थानक परिसर अशा अनेक ठिकणी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -