घरक्रीडाOmicron Variant : ओमिक्रॉनमुळे दक्षिण आफ्रिकेतील विमानसेवा बंद; ट्राय नेशन्स मालिकेलाही स्थगिती

Omicron Variant : ओमिक्रॉनमुळे दक्षिण आफ्रिकेतील विमानसेवा बंद; ट्राय नेशन्स मालिकेलाही स्थगिती

Subscribe

दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवीन विषाणू आढळल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले आहे

दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवीन विषाणू आढळल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले आहे. ओमान आणि यूएईमध्ये घाईघाईने मायदेशी परतल्यानंतर नामिबियातील आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग २ ट्राय नेशन्स मालिकेला आठवड्याच्या शेवटीला स्थगिती देण्यात आली आहे. क्रिकेट नामिबियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जोहान मुलर यांनी सांगितले की, यूएईने दक्षिण आफ्रिकन प्रदेशात आणि तेथील सर्व विमानसेवेवर बंदी घातल्यानंतर ही मालिका रद्द करण्यात आली. ओमिक्रॉन नावाचा कोरोनाचा नवीन विषाणू समोर आल्यानंतर यूएईने ने प्रवाशांना बंदी घातली आणि २९ नोव्हेंबरपासून या भागात कोणत्याही विमानाला परवानगी दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केले.

या निर्णयामुळे ट्राय नेशन्स मालिकेला बंद करण्यात आले आहे. नियोजित आठ सामन्यांपैकी फक्त दोनच सामने पूर्ण झाले. तर राहिलेल्या सामन्यांबाबत वेगळे नियाजन करण्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान सामन्यांच्या वेळापत्रकाचे नियोजन पुन्हा केले जाणार आहे आणि जेव्हा शक्य असेल तेव्हा राहिलेले सामने खेळवले जाणार आहेत. मार्च २०२३ पर्यंत ही मालिका स्थगित करण्यात आली आहे आणि या विषाणूचा प्रादुर्भाव कसा हाताळला जातोय आणि विमानसेवेवर किती काळ बंदी असेल या बाबत अद्याप काही कल्पना नसल्याचे जोहान मुलर यांनी सांगितले.

- Advertisement -

अचानक मालिका रद्द होण्यापूर्वी नामिबिया आणि ओमानने शुक्रवारी पहिला आंतरराष्ट्रीय सामना ४० धावांनी जिंकल्यानंतर नामिबिया आणि ओमानने क्रमवारीत बरोबरी साधली होती. तर ओमानने शनिवारी नऊ धावांनी दुसरा सामना जिंकला होता.

शुक्रवारी नवीन कर्णधार जेजे स्मितने केलेल्या उत्कृष्ट चमकदार कामगिरीमुळे त्याच्या संघाने सहज विजय मिळवला. तर शनिवारी स्मितने पुन्हा एकदा शानदार खेळी करत नामिबियाच्या आशा पल्लवित केल्या मात्र तो ९४ धावांवर बाद झाल्यावर नामिबियाला पराभवाचा सामना करावा लागला.

- Advertisement -

हे ही वाचा: http://Shane Warn : शेन वॉर्नच्या बाईकला मोठा अपघात, मुलगाही अपघातग्रस्त


 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -