घरदेश-विदेशकेजरीवाल हजर होण्यापूर्वी 'आप'च्या आणखी एका मंत्र्याच्या घरावर ईडीचा छापा

केजरीवाल हजर होण्यापूर्वी ‘आप’च्या आणखी एका मंत्र्याच्या घरावर ईडीचा छापा

Subscribe

दिल्ली सरकारचे आणखी एक मंत्री राजकुमार आनंद यांच्या घरावर सक्तवसूली संचालनालयाने छापे टाकले आहेत. ईडीचे पथक सिव्हिल लाइन्समधील मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानासह 9 ठिकाणी तपास करत आहे.

नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज ईडीने दारू घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी बोलावले आहे. दारू घोटाळ्याप्रकरणी त्यांची चौकशी केली जाणार आहे, मात्र त्याआधी ईडीच्या पथकाने आज सकाळी दिल्ली सरकारच्या आणखी एका मंत्र्याच्या घरावर छापा टाकला आहे. (Delhi government minister Rajkumar Anand raided by the Directorate of Enforcement investigating at 9 places including the minister s official residence in Civil Lines)

दिल्ली सरकारचे आणखी एक मंत्री राजकुमार आनंद यांच्या घरावर सक्तवसूली संचालनालयाने छापे टाकले आहेत. ईडीचे पथक सिव्हिल लाइन्समधील मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानासह 9 ठिकाणी तपास करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजकुमार आनंदच्या व्यवसायाशी संबंधित प्रकरणी ईडीचे पथक छापे टाकत आहे.

- Advertisement -

सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे, राजकुमार आनंद हा हवाला व्यवहारात सहभागी असल्याचा संशय आहे. या छाप्याचा संबंध सीमाशुल्क प्रकरणाशीही जोडला जात आहे.

कोण आहेत राजकुमार आनंद?

राजकुमार आनंद 2020 मध्ये पहिल्यांदा पटेल नगर मतदारसंघातून आमदार झाले. याआधी त्यांच्या पत्नी वीणा आनंद याही याच विधानसभा मतदारसंघातून आमदार होत्या. दिल्ली सरकारचे माजी मंत्री राजेंद्र पाल गौतम यांच्या जागी राजकुमार आनंद यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. बौद्ध परिषदेच्या एका कार्यक्रमात हिंदू देवी-देवतांवर अशोभनीय टिप्पणी करण्यात आली होती, ज्यामध्ये राजेंद्र पाल गौतम देखील उपस्थित होते, त्यानंतर बराच गदारोळ झाला आणि राजेंद्र गौतम यांना मंत्रिमंडळाचा राजीनामा द्यावा लागला.

- Advertisement -

मुख्यमंत्री केजरीवाल यांची आज चौकशी

दिल्ली दारू घोटाळ्याच्या तपासात ईडीने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज सकाळी 11 वाजता चौकशीसाठी बोलावले आहे. याप्रकरणी केजरीवाल यांची 16 एप्रिलला चौकशीही करण्यात आली होती. त्यावेळी सीबीआयने मुख्यमंत्र्यांची जवळपास 9 तास चौकशी केली होती. याच प्रकरणात मनीष सिसोदिया आणि संजय सिंह यांना अटक करण्यात आली आहे. तब्बल 9 महिन्यांनंतर केजरीवाल यांची पुन्हा एकदा चौकशी होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कार्यालय ते ईडी कार्यालयापर्यंत सुरक्षा व्यवस्था कडेकोट आहे. ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

(हेही वाचा: ‘दो नंबरी दो नवंबर को हाजिर हो’; केजरीवाल, मोइत्रांवर भाजप खासदाराचा निशाणा )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -