घरमनोरंजनShah Rukh Khan Birthday : 'या' 5 अभिनेत्रींसोबत शाहरुखने दिले सुपरहिट चित्रपट

Shah Rukh Khan Birthday : ‘या’ 5 अभिनेत्रींसोबत शाहरुखने दिले सुपरहिट चित्रपट

Subscribe

बॉलिवूडचा बादशहा म्हणजेच अभिनेता शाहरुख खानचा आज वाढदिवस आहे. शाहरुख खान आज त्याचा 58 वा वाढदिवस साजरा करत आहे. शाहरुखला त्याच्या चाहत्यांनी सुद्धा वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शाहरुखने त्याच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले. शिवाय शाहरुखने बॉलिवूड मधील अनेक अभिनेत्रींसोबत ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. किंग खानची या अभिनेत्रींसोबतची ऑन स्क्रिन जोडी प्रेक्षकांना आवडली. जाणून घेऊन या शाहरुख खानच्या टॉप 5 अभिनेत्री आणि चित्रपट.

शाहरुखचे सुपरहिट चित्रपट

  • शाहरुख खान आणि काजोल

When Shah Rukh Khan & Kajol's Steamy Scene In DDLJ Resulted In The Wastage Of Two Entire Magazines, Here's Why!

- Advertisement -

शाहरुख खान आणि काजोलच्या जोडीला प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली. दिल वाले दुल्हनिया ले जायेंगे, कभी ख़ुशी कभी गम, कुछ कुछ होता है यांसारखे अनेक चित्रपट या जोडीने बॉलिवूडला दिले. राहुल आणि अंजली यांची केमिस्ट्री प्रेक्षकांनी खूप आवडली. या चित्रपटांचे संवाद आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.

  • शाहरुख खान आणि जुही चावला

Juhi Chawla and Shah Rukh Khan together are the formula for a Bollywood classic; these movies are proof

- Advertisement -

‘एस बॉस’ हा शाहरुख खान आणि जुही चावला यांचा चित्रपट हिट ठरला. या दोघांची ऑन स्क्रीन केमिस्ट्री सुद्धा प्रेक्षांना आवडली. खऱ्या आयुष्यात सुद्धा जुही चावला शाहरुखची खूप चांगली मैत्रीण आहे. ‘एस बॉस’ सोबतच ‘राजू बनेगा जेंटलमॅन’ या सारख्या चित्रपटांमध्ये जुहीने शाहरुख सोबत काम केले आहे. शाहरुखच्या ‘रेड चिली या कंपनीमध्येही जुही चावला त्याची पार्टनर आहे.

  • शाहरुख खान आणि राणी मुखर्जी

Rani Mukerji says she would love to romance Shah Rukh Khan till 80 | Bollywood - Hindustan Times

‘चलते चलते’, ‘कभी अलविदा ना केहेना’ या चित्रपटात शाहरुख खान राणी मुखर्जी सोबत दिसला होता. हे चित्रपट आणि यातील गाणी सुद्धा प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहेत.

  • शाहरुख खान आणि प्रीती झिंटा

Shah Rukh Khan & his Versatile Chemistry with Preity Zinta - Filme Shilmy

‘कल हो ना हो, ‘वीर –झारा’ या चित्रपटांमध्ये शाहरुख खान अभिनेत्री प्रीती झिंटा हिच्यासोबत दिसला होता. या चित्रपटाला सुद्धा प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला.

  • शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण

Shah Rukh Khan Pens Note On Magical Chemistry With Deepika Padukone

‘चेन्नई एक्सप्रेस’, ‘ओम शांती ओम’, ‘पठाण’ हे चित्रपट शाहरुख आणि दीपिकाचे सुपर हिट ठरले. या  चित्रपटांमधील गाणीसुद्धा खूप जास्त हिट झाली.

 


हेही वाचा : सुधा मूर्ती यांच्या अॅनिमेटेड सिरीज ‘स्टोरी टाइम विथ सुधा अम्मा’चे लाँचिंग

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -