घरक्राइमदिल्ली पुन्हा हादरली! फक्त 350 रुपये लुटण्यासाठी अल्पवयीन मुलाने चाकूने केले 60...

दिल्ली पुन्हा हादरली! फक्त 350 रुपये लुटण्यासाठी अल्पवयीन मुलाने चाकूने केले 60 वार

Subscribe

नवी दिल्ली : दिल्लीतून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलाने फक्त 350 रुपयांसाठी दुसऱ्या अल्पवयीन मुलाची चाकूने भोसकून हत्या केली. धक्कादायक म्हणजे आरोपीने मुलावर एक-दोन नव्हे तर तब्बल 60 वेळा चाकूने हल्ला केला. आरोपी डोक्यात एवढा राग शिरला होता की, त्याने अल्पवयीन मुलाची मान कापण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या डोक्यातही लाथ मारली. उत्तर पूर्व दिल्लीतील वेलकम पोलीस स्टेशन परिसरात मंगळवारी (21 नोव्हेंबर) रात्री ही धक्कादायक घटना घडली असून सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. (Delhi shook again A minor stabbed himself 60 times with a knife to rob only Rs 350)

हेही वाचा – Gay Marriage : सुप्रीम कोर्टात पुन्हा होणार सुनावणी; याचिकेवर पुनर्विचार करण्यास न्यायालय तयार

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, हत्येवेळी अल्पवयीन आरोपी मद्यधुंद अवस्थेत होता. पोलिसांनी बुधवारी सकाळी 16 वर्षीय आरोपीला अटक केली असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने शाळा सोडली असून तो दिल्लीत आपल्या पालकांसोबत राहतो तर मृत मुलगा जाफ्राबादजवळ आपल्या आईसोबत राहत होता.

बिर्याणीसाठी पैसे मागितले आणि केली हत्या 

पोलिसांनी सांगितले की, आरोपी आणि मृत मुलगा दोघेही एकमेकांना ओळखत नव्हते. आरोपींने पीडितेकडे बिर्याणी घेण्यासाठी 350 रुपये मागितले आणि पीडितेने देण्यास नकार दिला. यानंतर आरोपींने पैसे हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोघांमध्ये हाणामारी झाली आणि यादरम्यान आरोपीने गळा आवळून पीडितेला बेशुद्ध केले. सीसीटीव्ही फुटेजनुसार, रात्री 10.20 च्या सुमारास आरोपीने पीडितेला एका अरुंद गल्लीत ओढून आणले आणि चाकूने तरुणाच्या मानेवर, कानावर आणि चेहऱ्यावर वार करण्यास सुरुवात केली. काही वेळ आरोपीने वाट पाहिली आणि त्याने पुन्हा पीडितेवर चाकूने वार केले. या घटनेनंतर पोलिसांनी पीडितेला जीटीबी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

- Advertisement -

हेही वाचा – Mahadev betting app : तपास मुंबई गुन्हे शाखेकडे वर्ग; हायप्रोफाइल केस काय आहे?

आरोपी मद्यधुंद अवस्थेत नाचू लागला

सीसीटीव्ही फुटेजनुसार, आरोपी पीडितेवर थोड्याथोड्या वेळाने सतत चाकूने हल्ला करताना दिसत आहे. यावेळी आरोपी पीडितेच्या डोक्यावर कधी लाथा मारताना दिसतो तर, कधी गुडघ्यावर बसताना दिसत आहे. धक्कादायक म्हणजे आरोपीने पीडितेच्या मानेलाही चावा घेतला. पीडितेची निर्घृण हत्या केल्यानंतर आरोपी सीसीटीव्ही फुटेजमध्ये नाचताना दिसत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -