घरदेश-विदेशमसूदला जागतिक दहशतवादी ठरवा; अमेरिका, फ्रान्स, ब्रिटनचा प्रस्ताव

मसूदला जागतिक दहशतवादी ठरवा; अमेरिका, फ्रान्स, ब्रिटनचा प्रस्ताव

Subscribe

जागतिक स्तरावर भारताला पाठिंबा, देशाच्या परराष्ट्र धोरणाला यश

जम्मू- काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सुत्रधार मसूद अझरला जागतिक दहशतवादी घोषीत करण्याची मागणी होत आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत बुधवारी हा प्रस्ताव ठेवण्यात आला. अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन यांनी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूदला काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यामुळे भारताच्या परराष्ट्र धोरणाला यश येताना दिसत आहे.

काय आहे प्रस्ताव

मसूद अझरने भारताच्या सीआरपीएफ जवानांवर केलेल्या हल्ल्यामुळे त्याला काळ्या यादीत टाकण्याची मागणी या प्रस्तावात करण्यात आली आहे. अझरवर जागतिक प्रवासाची बंदी घालण्यात यावी, त्याच्या संपतीवर जप्ती आणण्यात यावी, अझहरविरोधात शस्त्रास्त्र बंदी करण्यात यावी या मागण्यांचा त्यात समावेश आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -

१० दिवसात कारवाई

दरम्यान, संयुक्त राष्ट्राच्या १५ सदस्यांनी या प्रस्तावावर येत्या १० दिवसात निर्णय देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या मागणीमध्ये पुलवामा हल्ल्याची जबाबदारी मसूदच्या जैश-ए-मोहम्मदने स्विकारल्याचा मुद्दा देखील उपस्थित केला आहे. दरम्यान, या कारवाईमुळे पाकिस्तानची अंतराष्ट्रीय स्तरावर कोंडी केली जात आहे.

पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा निषेध 

पुलवामा दहशतवादी हल्लयात भारताचे ४० जवान शहीद झाले. या ह्ल्लयाचा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून देखील निषेद करण्यात आला. दरम्यान, पुलवामा हल्लयाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांच्या सीमेवर सध्या तणावाचे वातावरण आहे. सीमा भागात पाकच्या कुरापती सूरुच असून भारताकडून देखील त्याला चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. तसेच दोन्ही देशांनी थेट चर्चा करुन प्रश्न सोडवावा, शांतता राखावी असे आवाहन चीन आणि अमेरीकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी केले आहे. तणाव कायम राहिल्यास काहीही होऊ शकते, असे अमेरिकेने म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -