घरदेश-विदेशअभिनंदनला सुखरुप परत आणा; कुटुंबियांची आर्त हाक

अभिनंदनला सुखरुप परत आणा; कुटुंबियांची आर्त हाक

Subscribe

अभिनंदनला सुखरुप परत आणण्यासाठी सोशल मीडियावर अभियान चालवले जात आहे. त्यांचे नाव लावून ट्विटरवर एक ट्रेंड सुरु झाला आहे.

पाकिस्तानविरोधात कारवाई करत असताना पाकिस्तानच्या हद्दीमध्ये भारतीय हवाई दलाचे मिग २१ विमान कोसळले. या विमानातील पायलट बेपत्ता झाला होता. या पायलटला पाकिस्तानने अटक केले असल्याचा दावा केला होता. त्यानंतर बेपत्ता झालेल्या पायलटचे काही फोटो आणि व्हिडिओ पाकिस्तानच्या सुरक्षा दलाने जारी केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. विंग कमांडर अभिनंदन वर्थमान असं या बेपत्ता झालेल्या पायलटने नाव आहे. अभिनंदन यांचा पाकिस्तानच्या ताब्यात असलेला व्हिडिओ पाहून त्यांचे कुटुंबिय देखील चिंतेत आले असून त्यांनी अभिनंदनला परत सुरखरुप आणा असे भावनिक आवाहन सरकारला केला आहे. दरम्यान, भारताने देखील भारतीय हवाई दलातील पायलटला तत्काळ आणि सुखरूपपणे भारताच्या हवाली करण्यात यावे, अशा भारताने पाकिस्तानला दम भरला आहे.

अभिनंदनला परत आणा

पाकिस्तानी सुरक्षा दलाने जारी अभिनंदन यांचे रक्तबंबाळ झालेले फोटो त्याचबरोबर त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला. हे पाहून त्याचे कुटुंबिय दु:खी झाले. अभिनंदन यांच्या काकांनी ट्विट करुन सरकारकडे आमच्या अभिनंदनला सुरखरुप परत आणि अशी मागणी केली आहे. दरम्यान, ‘आम्ही अभिनंदनबद्दलच्या ज्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये आम्ही बघतो आहोत त्या पाहून खूप दुःख होत आहे. मी अभिनंदनची दृश्यं न्यूज चॅनेलवर बघत आहे. मी आता त्याच्या आई वडिलांना भेटायला जातो आहे. कृपा करून अभिनंदनला सुखरूप परत आणा, असं आवाहन अभिनंदनच्या काकांनी केलं आहे.’

- Advertisement -

अभिनंदनचे संपूर्ण कुटुंब देशसेवेत

अभिनंदन वर्थमान हे मूळचे चेन्नईचे राहणारे आहेत. त्यांचे पूर्ण कुटुंबंचं देशसेवेत आहे. त्याचे वडिलही वायुदलातच होते. एअर मार्शल (निवृत्त) सिमहाकुट्टी वर्थमान असं त्यांचे नाव आहे. तर अभिनंदन यांची पत्नी तन्वी मरवाहा एअरफोर्समध्ये स्क्वॉड्रन लीडर होत्या. अभिनंदनला सुखरुप परत आणण्यासाठी सोशल मीडियावर अभियान चालवले जात आहे. त्यांचे नाव लावून ट्विटरवर एक ट्रेंड सुरु झाला आहे.

मिग २१ लढाऊ विमान कोसळले

पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तळ उध्वस्त केले. त्यानंतर पाकिस्तनच्या खुरापती सुरु झाल्या पाकिस्तानने एलओसीवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. त्यानंतर पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी भारताच्या हद्दीमध्ये घुसखोरी केली. त्यावेळ भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानच्या लढाऊ विमानाला चोख प्रत्युत्तर देत असताना पाकिस्तानचे विमानत परत निघून गेले. त्यावेळी पाकिस्तानचे एक विमान भारताने पाडले. तर भारताचे मिग २१ लढाऊ विमान देखील कोसळले आणि ते पाकिस्तानच्या हद्दीत पडले. या विमानातील पायलट बेपत्ता झाला असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले होते. त्या पायलट नाव अभिनंदन वर्थमान आहे. दरम्यान, हा पायलट आमच्या ताब्यात असल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -