Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश संसदेच्या विशेष अधिवेशनासाठी नव्या ड्रेसकोडची चर्चा; कर्मचारी दिसणार नव्या पोशाखात

संसदेच्या विशेष अधिवेशनासाठी नव्या ड्रेसकोडची चर्चा; कर्मचारी दिसणार नव्या पोशाखात

Subscribe

18 ते 22 सप्टेंबर दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. यावर अनेक प्रकारचे राजकीय अंदाज बांधले जात आहेत. परंतू अद्यापही या विशेष अधिवेशनाचा विषय समोर आला नाही.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने संसदेच्या विशेष अधिवेशनाची घोषणा केली होती. येत्या 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान हे अधिवेशन पार पडणार आहे. या विशेष अधिवेशनावर विरोधकांकडून कडाडून टीका होत असताना आता याच विशेष अधिवेशनासंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे संसदेच्या दोन्ही सभागृहातील कर्मचारी आता नव्या पोशाखात दिसणार असून, त्याला भारतीयत्व असे नाव देण्यात आल्याचीही माहिती आहे.(Discussion of new dress code for special session of Parliament Employees will be seen in new clothes)

18 ते 22 सप्टेंबर दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. यावर अनेक प्रकारचे राजकीय अंदाज बांधले जात आहेत. परंतू अद्यापही या विशेष अधिवेशनाचा विषय समोर आला नाही. दरम्यान, संसदेच्या दोन्ही सभागृहात नवा ड्रेस कोड लागू केला जाऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या आत आणि बाहेरील कर्मचारी पुढील आठवड्यात नवीन संसद भवनात जाताना नवीन गणवेश परिधान करणार आहेत एवढे मात्र खरे.

असा असणार नवी पोशाख

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, नवीन गणवेशात दोन्ही सभागृहांच्या मार्शलच्या डोक्यावर मणिपुरी टोप्या दिसणार आहे, तर टेबल ऑफिस, नोटीस ऑफिस आणि संसदीय रिपोर्टिंग विभागात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी कमळाचा आकृतिबंध असलेले शर्ट तयार करण्यात आले आहेत. तर सर्व महिला अधिकाऱ्यांना नवीन डिझाइन केलेल्या साड्या देण्यात येणार आहेत. नवीन संसद भवनातील राज्यसभेचे गालिचेही कमळाच्या आकृतिबंधाने सजवण्यात आले आहेत

हेही वाचा : जरांगे पाटलांचे आंदोलन मोडून काढण्याचा डाव, कारण…; संजय राऊतांचा गौप्यस्फोट

18 फॅशन टेक्नॉलॉजी इंस्टिट्युटने सुचवले डिझाइनचे प्रस्ताव

- Advertisement -

या नवीन संकल्पेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, देशातील 18 नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी यांना नवीन गणवेशासाठी डिझाइन प्रस्ताव सुचवण्यास सांगण्यात आले होते. तज्ज्ञ समितीने त्या प्रस्तावांमधून नवीन गणवेशाला अंतिम रूप दिले असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा : सौदी अरेबियाच्या प्रिन्सने स्वाक्षरी करताच बारसू प्रकल्पाला गती; कामावर असणार समितीचा वॉच

हे होणार सर्व बदल

नवीन बदलांमध्ये अनेक विषय आहेत. त्यामध्ये पूर्वी मार्शल सभापतींच्या आसनाजवळ उभे राहतात आणि पीठासीन अधिकाऱ्यांना त्यांच्या दैनंदिन कामात मदत करतात. नवीन ड्रेस कोडनुसार, मार्शल आता सफारी सूटऐवजी क्रीम रंगाचा कुर्ता पायजमा घालतील आणि त्यांच्या डोक्यावर पगडीऐवजी मणिपुरी टोपी असणार आहे. पाच विभागांचे अधिकारी देखील त्यांचे हलके निळे सफारी सूट सोडतील आणि त्याऐवजी कमळाचे आकृतीबंध असलेले स्पोर्ट्स बटण-डाउन शर्ट घालतील. याशिवाय ते क्रीम रंगाचे जॅकेट आणि हलकी पांढरी पँट घालतील. विभागांनुसार सध्याच्या निळ्या, कोळशाच्या आणि चारकोल रंगाच्या सफारी सूटमधून हा महत्त्वपूर्ण बदल असणार आहे.

- Advertisment -