घरदेश-विदेश४ वर्षाखालील मुलांना dextromethorphan सिरप देऊ नये, केंद्र सरकारचे आदेश

४ वर्षाखालील मुलांना dextromethorphan सिरप देऊ नये, केंद्र सरकारचे आदेश

Subscribe

कफ सिरपच्या दुष्परिणामामुळे तीन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. या घटनेला आता साडे चार महिने पूर्ण झाले आहेत. या घटनेच्या तपास अहवालात त्या मुलांना dextromethorphan कप सिरप दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या आरोग्य सेवा महासंचालनालयाने (DGHS) दिल्ली सरकारच्या आरोग्य सेवा महासंचालनालयाने गल्लीबोळ्यातील दवाखान्यांना नोटीस पाठवत चार वर्षांखालील लहान मुलांना dextromethorphan देऊ नये असे निर्देश दिले आहेत.

दरम्यान दिल्लीतील एका लहान दवाखान्यात १६ मुलांना dextromethorphan कप सिरप दिल्याने त्यांची प्रकृती खालावली होती. यामुळे या मुलांना कलावती सरन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान यातील तिघांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने (CDSCO) सिरपची तपासणी केली. या तपासणीत सिरप अतिशय खालच्या दर्जाचे असल्याचे आढळले. त्यामुळे डीजीएचएसने dextromethorphan सिरपवर तात्काळ बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत. अशा परिस्थितीत पालकांनीही dextromethorphan सिरपचा वापर थांबवावा किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधांचे सेवन करावे असेही डीजीएचएसने सांगितले आहे.

- Advertisement -

या प्रकरणात योग्य ती कारवाई करण्य़ासाठी दिल्ली ड्रग्स कंट्रोलरलाही याची माहिती देण्यात आली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सध्या सुरु आहे. दिल्ली आरोग्य सेवा विभागाचे महासंचालक डॉ. नूतन मुंडेजा यांनी सांगितले की, ही घटना समोर आल्यानंतर गल्ली बोळ्यातील लहान क्लिनिक आणि दवाखान्यांमध्ये कप सिरपचा वापर थांबवण्याचे आदेश दिले आहेत.


TET परीक्षा गैरव्यवहार प्रकरण: तुकाराम सुपेंच्या घरातून दोन कोटींहून अधिकची रोकड अन् सोनं जप्त


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -