घरट्रेंडिंगJio,Airtel,Vi : जाणून घ्या, २८ दिवसांच्या वैधतेसह सर्वोत्कृष्ट 4G प्री-पेड योजना, आता...

Jio,Airtel,Vi : जाणून घ्या, २८ दिवसांच्या वैधतेसह सर्वोत्कृष्ट 4G प्री-पेड योजना, आता OTT सब्सक्रिप्शनही मिळणार

Subscribe

जिओ,एअरटेल आणि वोडाफोन,आयडियाकडे अनेक 4G प्लॅन आहेत.काही दिवसांपूर्वी या तीन कंपन्यांनी आपल्या प्री-पेड प्लॅनवरील दर वाढवले होते.असे असले तरी अनेक वापरर्क्त्यांना याबाबतची पुरेपुर माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे एअरटेल,जिओ आणि वोडाफोन आयडिया यांच्या बेस्ट 4G प्री-पेड प्लॅनबद्दल जाणून घ्या.ज्या प्लॅनमध्ये २८ दिवसांच्या वैधतेसह काही अधिकच्या सुविधा देण्यात आल्या आहेत.

जिओ 4G प्लॅन

जिओमध्ये काही प्लॅन आहेत, ज्यामध्ये २८ दिवसांची वैधता मिळते.पहिला प्लॅन २९९ रुपयाचा असून, त्यात ग्राहकांना रोज २ जीबी डाटा मिळतो. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंगसुद्धा मिळते .त्याचबरोबर या प्लॅनमध्ये रोज १०० SMS करण्याची सुविधा आहे.

- Advertisement -

याशिवाय २३९ रुपयांचा २८ दिवसांच्या वैधतेचा प्लॅन उपलब्ध असून, त्यात १.५ जीबी इतका आहे.तसेच, २०९ रुपयांच्या प्लॅनमध्ये २८ दिवसांच्या वैधतेसह १ जीबी डाटा उपलब्ध आहे.जर तुम्हाला अधिक डाटाची आवश्यकता, असेल तर तुम्ही ६०१ रुपयांचा रिचार्ज करु शकता.या प्लॅनमध्ये तुम्हाला ३ जीबी डाटा मिळेल.याशिवाय या प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिडेट कॉलिंगची सुविधा उपलब्ध आहे.

एअरटेल 4G प्लॅन

एअरटेलच्या 4G प्लॅनमध्ये २६५ रुपयांच्या प्लॅनमध्ये २८ दिवसांच्या वैधतेसह अनलिमेटेड कॉलिंग आणि १ जीबी डाटा मिळणार आहे.दूसरा प्लॅन २९९ रुपयांचा आहे. त्यामध्ये २८ दिवसांच्या वैधतेसह अनलिमिटेड कॉलिंग आणि १.५ जीबी डाटा मिळणार आहे. ३५९ रुपयांच्या प्लॅनमध्ये २ जीबी डाटा मिळण्यासोबत कॉलिंग फ्री असणार आहे.त्याचबरोबर ५९९ रुपयांच्या २८ दिवसांच्या वैधतेसह प्लॅनमध्ये ३ जीबी डाटा मिळेल.

- Advertisement -

आता OTT सब्सक्रिप्शनही मिळणार

या सर्व प्लॅनच्या ग्राहकांना अॅमेझॉन प्राइम व्हिडिओचे ३० दिवसांचे मोबाईल सब्सक्रिप्शन मिळेल.याशिवाय ५९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये Disney + Hotstar चे सब्सक्रिप्शन मिळणार आहे. एअरटेलकडे ४४९ रुपयांचाही २८ दिवसांचा प्लॅन असून,ज्यामध्ये रोज २.५ जीबी डाटा मिळणार आहे. शिवाय अनलिमिटेड कॉलिंगसुद्धा मिळेल.तसेच १७९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ३ जीबी डाटासह अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज ३०० मॅसेज करु शकता.

वोडाफोन-आयडियाचे २८ दिवसांचे प्लॅन

वोडाफोन-आयडियाकडे २८ दिवसांच्या वैधतेचे अनेक प्लॅन आहेत. ज्यामध्ये रोज १ जीबी,१.५ जीबी आणि २.५ जीबी आणि ३ जीबी डाटा मिळतो आहे. या प्लॅनची किंमत अनुक्रमे,२६९ रुपये,२९९ रुपये,३५९ रुपये,४०९ रुपये आणि ४७५रुपये आहे.सर्व प्लॅनमध्ये रोज १०० SMS आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा आहे.


हे ही वाचा – Panama Papers Leak: बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनला ईडीचा समन्स


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -