घरताज्या घडामोडीShocking Video ! भटक्या कुत्र्यांनी ४ वर्षांच्या चिमुरडीला आडवे पाडले, अन् लचके...

Shocking Video ! भटक्या कुत्र्यांनी ४ वर्षांच्या चिमुरडीला आडवे पाडले, अन् लचके तोडले

Subscribe

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील एक व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आहे एका ४ वर्षीय चिमुरडीचा. एक मजुराची मुलगी खेळत असताना अचानक तिचा पाठलाग चार ते पाच भटक्या कुत्र्यांकडून करण्यात आला. या व्हिडिओमध्ये चिमुरडीचा पाठलाग करताना चार ते पाच कुत्रे दिसत आहेत. या कुत्र्यांनी त्या चिमुरडीला खाली पाडले. त्यानंतर चिमुरडीच्या अंगाचे लचके तोडण्यासाठीची सुरूवात केली. अंगावर काटा आणणारा असा हा व्हिडिओ आहे. या घटनेत चिमुरडीच्या अंगावर अनेक जखमा झाल्या आहेत. (Dog attacked 4 years old girl at Bhopal human rights commission took cognisance)

- Advertisement -

हल्ला इतका भयंकर होता की, या हल्ल्यामुळे चिमुरडी पुर्णपणे घाबरून गेली आहे. या घटनेमध्ये मुलीच्या कान, नाक, डोक्यावर आणि हातावरही जखमी झाल्या आहेत. कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात दाताचे निशाण हे चेहऱ्यासह पोट, कंबर आणि खांद्यावरही आढळून आले आहेत. शनिवारी सायंकाळी भोपाळमध्ये घडलेली ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. सायंकाळी ४.१५ वाजताच्या सुमारास ही घटना सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली आहे.

या चिमुरडीचे वडिल मजुरीचे काम करतात. आपल्या कामाच्या ठिकाणी त्यांची मुलगी गुड्डी खेळत होती. त्याठिकाणीच चार ते पाच कुत्रे हे त्या चिमुरडीचा पाठलाग करताना दिसले. त्या हल्ल्यात मुलगी घाबरून खाली पडली. त्यानंतर कुत्र्यांनी संपुर्ण अंगाचे लचके तोडण्याची सुरूवात केली. तसेच अनेक ठिकाणी चावाही घेतला. वेळीच एक व्यक्ती धावून आल्याने त्या मुलीचा जीव वाचवणे शक्य झाले. त्या व्यक्तीने कुत्र्यांना हटकल्यामुळे त्य़ाठिकाणी हल्ला करणारे कुत्रे पळून गेले. अशाच जखमी अवस्थेत मुलीला त्या ठिकाणाहून नजीकच्या हमीदिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

- Advertisement -

भोपाळमध्ये भटक्या कुत्र्यांकडून हल्ला होण्याचे प्रकार वारंवार समोर आले आहेत. याआधीही कोलार, तुलसी नगर, अयोध्या नगर, करोंद यासारख्या भागात कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. भटक्या कुत्र्यांकडून होणाऱ्या उपद्रवामुळेच स्थानिक लोकही त्रस्त आहेत. पण तक्रारीनंतरही कारवाई होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पालिकेकडून तक्रारीनंतरही दुर्लक्ष केले जात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी समोर आल्या आहेत.

या घटनेनंतर मध्य प्रदेशच्या मानव अधिकार आयोगाने संपूर्ण घटनेची दखल घेतली आहे. या घटनेवर आयोगाने भोपाळ महापालिका आयुक्त आणि भोपाळ जिल्हा प्रशासनाच्या आयुक्तांकडून तत्काळ असे आठवड्याभरात उत्तर मागितले आहे. तसेच घटनेबाबतची सखोल माहिती देण्याचे आदेशही दिले आहेत. भोपाळमध्ये भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी लाखो रूपये खर्च करण्यात येतात. पण पैसे खर्च करूनही भटक्या कुत्र्यांची दहशत संपत नसल्याचे चित्र या व्हिडिओच्या निमित्ताने समोर आले आहे.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -