घरअर्थजगतPPF: 500 रुपयांची गुंतवणूकही बनवू शकते तुम्हाला करोडपती, जाणून घ्या 'या' सरकारी...

PPF: 500 रुपयांची गुंतवणूकही बनवू शकते तुम्हाला करोडपती, जाणून घ्या ‘या’ सरकारी योजनेचे फायदे

Subscribe

पोस्ट ऑफिस किंवा कोणत्याही सरकारी बँकेतून या योजनेत गुंतवणूक करु शकता.

PPF lnvesment : नोकरी करता करता सध्याच्या घडीला गुंतवणुकीचे नियोजन करणे खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्ही अशाप्रकारचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. अनेक जण आजही सरकारी योजनांमध्ये डोळ बंद करुन गुंतवणूक करणे पसंत करतात. कारण सरकारी योजनेत गुंतवणूक केली तर पैसे सुरक्षित राहतात याशिवाय चांगला रिर्टनही चांगला मिळतो. त्यामुळे अनेक जुन्या सरकारी योजना आजही सुरु आहेत, ज्यामध्ये तुम्ही थोड्या रकमेतून गुंतवणूक सुरु करु शकता आणि भविष्यासाठी चांगला पैसा जमा करुन ठेवू शकता. तुम्हाला गुंतवणुकीसाठीची PPF योजना (Public provident fund) माहितच असेल. ज्यात तुम्ही 500 रुपयांची गुंतवणूकही करोडपती बनू शकता. वाचून खोटं वाटत असेल पण हे खरं आहे. पोस्ट ऑफिस (post office) किंवा कोणत्याही सरकारी बँकेतून (bank) या योजनेत गुंतवणूक करु शकता. नेमकं ही योजना काय आहे आणि याचे फायदे काय आहेत ते जाणून घेऊ…

500 रुपयांची करा गुंतवणूक

तुम्ही PPF मध्ये 500 रुपयांपर्यंत गुंतवणूक करुन खाते सुरू करू शकता. तुम्ही या खात्यात एका वर्षात जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये आणि दरमहा जास्तीत जास्त 12500 रुपये गुंतवू शकता. PPF योजनेचा मॅच्युरिटी पिरियड 15 वर्षे आहे आणि तुम्ही तो 5 ते 5 वर्षे वाढवू शकता.

- Advertisement -

योजनेत किती व्याज मिळतो?

केंद्र सरकारच्या या योजनेत गुंतवणूकदारांना 7.1 टक्के दराने व्याज मिळते. या योजनेत मार्चनंतर व्याज दिले जाते. या योजनेत तुम्ही तुमच्या नावाने किंवा आपल्या अल्पवयीन मुलाच्या नावाने पीपीएफ खाते ओपन करु शकता.

योजनेत गुंतवणूक करून करोडपती कसे व्हाल?

जर तुम्हाला या योजनेत पैसै गुंतवणूक करुन करोडपती व्हायचे असल्यास किमान २५ वर्षे गुंतवणूक करावी लागेल. 1.5 लाख रुपयांच्या वार्षिक गुंतवणुकीनुसार 37,50,00 रुपये जमा होतात. यावर वर्षाला ७.१ टक्के दराने 65,58,012 रुपये व्याज दिले जाईल, तर मॅच्युरिटीची रक्कम 1,03,08,012 इतकी असेल.

- Advertisement -

टॅक्स सवलतीचा मिळेल फायदा

जर तुम्हाला या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला  टॅक्स सवलतीचा लाभही मिळेल. तुम्ही आयकर कलम 80C अंतर्गत टॅक्स सूट घेऊ शकता. या योजनेत गुंतवणूक करणे केवळ सुरक्षितच नाही तर  गुंतवणुकीवर चांगला वार्षिक रिटर्न देखील मिळू शकतो. (PPF earning)


Bharat Sasane : 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -