घरक्राइमअमेरिकेत मंदिरातून दानपेटी लंपास, घटनेमुळे नागरिकांमध्ये खळबळ

अमेरिकेत मंदिरातून दानपेटी लंपास, घटनेमुळे नागरिकांमध्ये खळबळ

Subscribe

अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये मंदिरात चोरीची मोठी घटना घडली आहे. चोरट्यांनी थेट दानपेटीवर डल्ला मारत चोरीची घटना घडवून आणली आहे. या घटनेमुळे हिंदू नागरिकांना मोठा धक्का बसला आहे.

न्युयॉर्क : अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये मंदिरात चोरीची मोठी घटना घडली आहे. चोरट्यांनी थेट दानपेटीवर डल्ला मारत चोरीची घटना घडवून आणली आहे. या घटनेमुळे हिंदू नागरिकांना मोठा धक्का बसला आहे. तर घटनास्थळी लोकांमध्ये खळबळ उडाली आहे. सॅक्रामेंटो येथील पार्कवे शेजारील हरी ओम राधा कृष्ण मंदिरात चोरीची घटना घडली. काल सोमवारी (ता. 30 ऑक्टोबर) पहाटे 2.15 वाजताच्या सुमारास मंदिरात चोरीची घटना घडल्यानंतर येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सदर घटनेची माहिती स्थानिक वृत्तपत्राकडून देण्यात आली आहे. तर ही घटना मंदिराच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून या घटनेतील आरोपींचा पोलिसांकडून तपास घेण्यात येत आहे. (Donation box looted from a temple in America, citizens were shocked by the incidentnew york)

हेही वाचा – इथे ओशाळली माणुसकी; विमानातून उतरण्यासाठी दिव्यांग व्यक्तीला नाकारली व्हीलचेअर, मग त्याने…

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, सॅक्रामेंटो येथील पार्कवे शेजारील हरी ओम राधा कृष्ण मंदिरात पहाटेच्या सुमारास चोरीची घटना घडली. या घटनेत चोरट्यांनी थेट मंदिारातील दानपेटी उचलून नेली. याबाबत सांगताना ज्यांचे मंदिर आहे त्या गुरू महाराजांच्या पत्नीने सांगितले की, सुरुवातील मंदिराच्या इमारतीत कोणीतरी असल्याचा भास झाला. त्यानंतर चोरटे मंदिराच्या दानपेटीकडे गेले आणि त्यांनी ती उचलली. या दानपेटीचे अंदाजे वजन हे 100 पौंड होते. तर घडलेली चोरीची घटना ही धक्कादायक असून यामुळे मोठे नुकसान झाले असल्याचे मत गुरू महाराज यांच्याकडून व्यक्त करण्यात आले आहे.

सॅक्रामेंटो पोलीस या मंदिरात झालेल्या चोरीच्या घटनेचा तपास करत आहे. पोलिसांनी अद्यापही मंदिरात नेमकी कोणत्या वस्तूंची चोरी झाली आहे, याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. परंतु, दानपेटी चोरीला गेल्याची माहिती पोलिसांकडून स्पष्टपणे देण्यात आली आहे. मंदिराच्या आवारात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये चोरी करण्यासाठी 6 जण आल्याचे दिसत आहे. यांतील दोघांनी मंदिरात जाऊन चोरी केल्याचे पाहायला मिळत असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे. तर या प्रकरणी अद्यापही कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. परंतु, या घटनेची सखोल चौकशी करण्यात येत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

तर, या घटनेचा निषेध करत, यूएस-आधारित वकील संघटना कोलिशन ऑफ हिंदूज ऑफ नॉर्थ अमेरिका (COHNA) ने सॅक्रामेंटो पोलिसांना ही घटना गांभीर्याने घेण्यास सांगितले आहे. त्याशिवाय पोलिसांनी या घटनेचा संभाव्य द्वेषपूर्ण गुन्हा म्हणून तपास करावा, असेही त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. तर या प्रकरणातील चोरांची ओळख पटविता यावी, यासाठी पोलीस स्थानिक नागरिकांची मदत घेत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -