घररायगडमुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर रुग्णवाहिकेच्या सिलेंडरचा स्फोट;महिलेचा मृत्यू

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर रुग्णवाहिकेच्या सिलेंडरचा स्फोट;महिलेचा मृत्यू

Subscribe

पोलिस कर्मचार्‍याची मोटार सायकल देखील जळून खाक

खोपोली-:
मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर (Mumbai-pune express)अपघाताच्या घटना नेहमीच घडत असतात. अपघात समयी रुग्णवाहिका धावून येते. आरोग्य सेवेची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणार्‍या रुग्णवाहिकेमधील सिलेंडरचा स्फोट होऊन एका महिलेला आपले प्राण गमवावे (Woman dies in ambulance explosion) लागले आहे.तर घटना स्थळी मदतीला आलेल्या पोलिस कर्मचार्‍याची मोटार सायकल देखील जळून खाक झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार निलाबाई भगवान कवालदार (वय ७४) राहणार ऐरोली, नवी मुंबई यांना न्यू बॉम्बे हॉस्पिटल येथून गुलबर्गा येथे उपचाराकरिता घेऊन रुग्णवाहिका मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे येथून पुण्याकडे निघाली होती.या रुग्णवाहिकेमध्ये सहा नातेवाईक, रुग्ण, एक महिला डॉक्टर आणि चालक होते.दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही रुग्णवाहिका पुण्याकडे रवाना होत असताना अचानक रुग्णवाहिकेमध्ये शॉर्ट सर्कीट होऊन आग लागली. या आगीनंतर रुग्णाला नातेवाईक, डॉक्टरांनी बाहेर काढून रस्त्याच्याकडेला सर्वजण उभे राहिले. त्यानंतर सदरची रुग्णवाहिला ही पेटत्या अवस्थेत ५० मीटर मागे जाऊन त्यातील ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाल्याने रुग्णवाहिकेच्या छताचा पत्रा आणि इतर लोखंडी पार्ट रस्त्यावर विखरले होते. या स्फोटात एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

आग लागल्याने वाहतूक कोंडी झाली होती. त्यासाठी नियोजन करण्याकरिता घटनास्थळी आलेले पोलिस कर्मचारी चेमटे यांची युनिकॉन मोटार सायकल क्रमांक-एम.एच-०६ बी.एन-१०५८ ही जळून खाक झाली आहे.रुग्णवाहिकेला लागलेली आग देवदूत आणि फायरब्रिगेडच्या मदतीने विझवण्यात आली आहे.रुग्णवाहिकेच्या स्फोटामुळे उडालेले रुग्णवाहिकेचे चिथडे रोडपासून बाजूला करीत वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यात आली.

घटना स्थळी वाहतुक पोलिस यंत्रणेचे एपीआय योगेश भोसले, खोपोली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शितल राऊत, एपीआय हरेश काळसेकर आणि देवदूत यंत्रणा, आय.आर.बी पेट्रोलिंग कर्मचारी, फोर्स महाराष्ट्र सुरक्षा बल लोकमान्य अ‍ॅम्बुलन्स सेवा त्याचप्रमाणे सामाजिक संस्थेचे सदस्य मदत कार्यात सहभागी झाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -