घररायगडरायगडकरांच्या दारी पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना

रायगडकरांच्या दारी पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना

Subscribe

योजनेची अंमलबजावणी, समन्वय व संनियंत्रण करिता जिल्हाधिकारी रायगड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा अंमलबजावणी समिती स्थापन करण्यात आली आहे. जिल्हयामध्ये योजने अंतर्गत आज अखेर पर्यंत १३५ लाभार्थ्यांची सीएससी केंद्रामार्फत विश्वकर्मा कारागिरांची नोंदणी करण्यात आली आहे.

रायगड-: केंद्र शासनाची पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना (पीव्हीकेएसयो) गावस्तरावरील जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात या योजनेची आढावा बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. (PM Vishwakarma Yojana Review meeting)

यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी रमेश सुरुंग, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त अमिता पवार, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी.एल.हरळया, बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक तथा जिल्हा अग्रणी बँक अधिकारी विजय कुलकर्णी यासह विविध शासकीय अधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

ग्रामीण व शहरी भागातील पारंपारिक कारागिरांच्या उद्योगामध्ये वाढ होण्याच्या दृष्टीने शासनाने प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. सदर योजनेमध्ये १८ प्रकारच्या उद्योगांचा समावेश आहे. त्यात सुतार, लोहार, विणकर, सोनार, कुलुप बणविणारे, कुंभार, खेळणी बनविणारे, न्हावी, माळी, चर्मकार, धोबी, शिंपी, शिल्पकार, गवंडी, मासेमारी जाळी बविणारे, बोटनिर्माता, हॅमर टूलकिट मेकर आणि स्टोन ब्रेकर इत्यादी उद्योग आहेत.

होतकरू इच्छुक कारागीरांना संधी
पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना ही अत्यंत उपयुक्त योजना असून पारंपरिक उद्योजकांचा विकास साधण्यासाठी ग्रामसेवक व सरपंचांनी ऑनलाईन पद्धतीने प्रथम ग्रामपंचायतांची नोंदणी करून घ्यावी. या योजनेबाबत गावपातळीवर जनजागृती करून ही योजना जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. या योजनेच्या लाभासाठी पात्र लाभार्थांनी सामुहिक सुविधा केंद्राच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी. या योजनेचा जास्तीत जास्त होतकरू इच्छुक कारागीरांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ.म्हसे यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -